TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

‘झी मराठी अवॉर्ड्स २०२६’मध्ये रंगणार ‘चॅलेंज’चा धमाका! कलाकारांचे हटके परफॉर्मन्स आणि BSF जवान कल्याणी यांचा विशेष सन्मान

‘पाऊल पुढे पडलंय… जमलंय!’ या संकल्पनेतून साकारणार पुरस्कार सोहळा; आवडत्या जोड्यांचे डान्स, रेड कार्पेटची झगमगाट आणि देशसेवेचा अभिमानास्पद क्षण ठरणार आकर्षण

मुंबई : प्रत्येक पाऊल पुढे टाकताना नवे आव्हान समोर येते. मात्र, आपल्या माणसांची साथ, स्वतःवरचा विश्वास आणि जिद्द यांच्या जोरावर या आव्हानांवर मात करत यशाचा मार्ग गाठता येतो. याच प्रेरणादायी भावनेतून यंदाचा ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२६’ हा सोहळा ‘चॅलेंज’ या संकल्पनेवर आधारित असणार आहे. ‘पाऊल पुढे पडलंय… जमलंय!’ या भावनेतून साकार होणाऱ्या या सोहळ्यात मनोरंजन, नृत्य, धमाल आणि अनेक अनपेक्षित सरप्राइजेसची मेजवानी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

रेड कार्पेटवर कलाकारांची झगमगाटी एन्ट्री

सोहळ्याची सुरुवात झी मराठीवरील लोकप्रिय मालिकांमधील कलाकारांच्या दिमाखदार रेड कार्पेट एन्ट्रीने होणार आहे. कलाकारांचे आकर्षक आणि हटके पोशाख, त्यांची अनोखी स्टाइल आणि खास लूक यामुळे रेड कार्पेटची रंगत वाढणार आहे. यंदा कलाकारांमध्येही एकमेकांना आव्हान देण्याची चुरस पाहायला मिळणार असल्याने कोण बाजी मारणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना असेल.

लाडक्या जोड्यांचे धमाकेदार डान्स परफॉर्मन्स

प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांमधील जोड्या आपल्या नृत्याने मंचावर रंगत आणणार आहेत. कमळी–ऋषी, सावली–सारंग, जान्हवी–विश्वा, भावना–सिद्धू, जय–शरू, तारिणी–केदार, समर–स्वानंदी, दीप–ज्योती आणि गौरी–शंकर या जोड्यांचे नृत्य सादरीकरण पाहायला मिळणार आहे. प्रेम, मैत्री आणि नात्यांमधील गोडवा उलगडणाऱ्या या परफॉर्मन्समध्ये कलाकारांची केमिस्ट्री आणि नृत्याची जुगलबंदी विशेष आकर्षण ठरणार आहे.

हेही वाचा –  मनोज जरांगे यांच्या कथित ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी होणार; मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन

नायिका, नायक आणि खलनायकांचे हटके सादरीकरण

झी मराठीच्या दमदार स्त्री व्यक्तिरेखा पारंपरिक मंगळागौरीच्या रंगात रंगणार आहेत. उत्साहाने भरलेल्या या सादरीकरणात अचानक येणारे अनपेक्षित आव्हान कार्यक्रमात वेगळीच रंगत आणणार आहे. तर खलनायकांच्या खास सादरीकरणातून त्यांच्या व्यक्तिरेखांचे वेगवेगळे पैलू पाहायला मिळतील.

नायिकांच्या सादरीकरणातून कल्पनारम्य विश्वाची सफर घडणार असून, नायकांच्या परफॉर्मन्समध्ये मुलांची उडणारी तारांबळ आणि त्यातून निर्माण होणारी धमाल प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहे.

BSF जवान कल्याणी यांचा विशेष सन्मान

‘झी मराठी अवॉर्ड्स २०२६’मधील सर्वांत अभिमानास्पद क्षणांपैकी एक म्हणजे देशसेवेत कार्यरत असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवान कल्याणी यांचा सन्मान. मालिकेतील ‘तारिणी’ या व्यक्तिरेखेची आठवण करून देणाऱ्या कल्याणी यांना पहिल्यांदाच झी मराठी अवॉर्ड्सच्या मंचावर आमंत्रित करून गौरविण्यात आले.

देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या कल्याणी यांना ‘मानाची पैठणी’ आणि दिवाळीचा फराळ भेट देऊन सन्मानित करण्यात आले. झी मराठीच्या सर्व नायिका, ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ आणि हर्षदा खानविलकर यांनी एकत्र येत त्यांचा गौरव केला.

देशासाठी समर्पित भावनेने कर्तव्य बजावणाऱ्या जवानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा खास क्षण ठरला. मनोरंजनाच्या मंचावर देशसेवेचा सन्मान झाल्याने उपस्थितांसाठीही हा अभिमानाचा आणि आनंदाचा अनुभव ठरला.

एकूणच, ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२६’ हा केवळ पुरस्कारांचा सोहळा न राहता आव्हानांवर मात करणाऱ्या कलाकारांच्या जिद्दीचा, नात्यांमधील साथीचा आणि यशाचा उत्सव ठरणार आहे. मनोरंजनाची मेजवानी आणि BSF जवान कल्याणी यांचा सन्मान अशा अनेक खास क्षणांमुळे हा सोहळा प्रेक्षकांच्या लक्षात राहण्याची अपेक्षा आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button