Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; भाषणानंतर आयोजकांवरही भडकले, म्हणाले ‘मला कोपऱ्यात कुणी टाकलं?’

‘आम्ही फक्त भाषण देत नाही, शेतकऱ्यांची चूल पेटवतो’; दिवाळी शिधा, शिलाई मशीन, सायकली आणि सामूहिक विवाहसोहळ्यांबाबत शिंदेंची घोषणा

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित दसरा मेळाव्यातून विरोधकांवर टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला लक्ष्य करत शिंदे यांनी, “महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री बनलेले उबाठा खरे व्होट दरोडेखोर आहेत,” असा आरोप केला. तसेच शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या मदतकार्याचा उल्लेख करत विरोधकांना कामातून उत्तर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘आम्ही शेतकऱ्यांची चूल पेटवणारे’

दसरा मेळाव्यातील भाषणात एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना मदत आणि रेशन पुरवण्याच्या मुद्द्यावर भर दिला. “आम्ही फक्त भाषण देणारे नाही, तर शेतकऱ्यांची चूल पेटवणारे आणि रेशन देणारे आहोत. तुम्ही बिस्किटाचा पुडा तरी दिला आहे का?” असा सवाल त्यांनी विरोधकांना केला.

शेतकऱ्यांना दिवाळीचा शिधा देण्याचे काम सुरू असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. आपल्यावर दररोज टीका केली जात असली, तरी त्याला कामातून उत्तर देणार असल्याचे त्यांनी भाषणात नमूद केले.

हेही वाचा –  विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान; १८२ उमेदवार रिंगणात, १०.६८ लाख मतदार बजावणार हक्क

परभणीत २५ हजार शिलाई मशीनचे वाटप

शेतकरी कुटुंबांसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत असल्याचा उल्लेख करत शिंदे यांनी परभणीत २५ हजार शिलाई मशीनचे वाटप करण्यात आल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या मुलींना २५ हजार सायकली देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ केल्याची माहितीही त्यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहासाठी मदत करण्याची भूमिका मांडताना, त्यांच्या लग्नाची जबाबदारी घेण्यास सरकार आणि आपण मागे हटणार नसल्याचे शिंदे म्हणाले. यासाठी सामूहिक विवाहसोहळे आयोजित केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

भाषणानंतर आयोजकांना सुनावले

दसरा मेळाव्यातील भाषण संपल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मंचावरील व्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली. “अरे, आयोजन कुणी केलेलं? मला कोपऱ्यात कुणी टाकलं? पुढच्या वेळेस मला लोकांच्या समोर पाहिजे. हे लक्षात ठेवा,” अशा शब्दांत त्यांनी आयोजकांना सुनावले.

विरोधकांवरील टीका, शेतकऱ्यांसाठीच्या मदतकार्याचा उल्लेख आणि भाषणानंतर आयोजकांबाबत व्यक्त केलेली नाराजी यामुळे शिंदे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाची चर्चा सुरू झाली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button