‘सिल्वराईज ग्रुप’च्या माध्यमातून रोजगारनिर्मितीला मोठी चालना!
चाकण औद्योगिक क्षेत्रातील विस्तारामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी : खासदार श्रीरंग बारणे

– उद्योजक कार्तिक लांडगे यांच्याकडून आमदार महेश लांडगे यांच्या वतीने शुभेच्छा
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
चाकण परिसरातील वाढत्या औद्योगिक विस्ताराला अधिक गती देण्यासोबतच स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यात सिल्वराईज ग्रुप महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय वाटचाल करणाऱ्या सिल्वराईज ग्रुपच्या माध्यमातून औद्योगिक विकासाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. शिंदिगाव, चाकण-२ येथे उभारण्यात येणारा ‘सिल्वराईज इंडस्ट्रियल पार्क’ हा या दृष्टीने महत्त्वपूर्ण प्रकल्प ठरणार आहे.
या इंडस्ट्रियल पार्कच्या भूमिपूजनप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे यांनी औद्योगिक विकास आणि रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले. औद्योगिक क्षेत्राचा विस्तार झाल्यास स्थानिक तरुणांना तांत्रिक, अभियांत्रिकी, व्यवस्थापन तसेच कुशल आणि अकुशल कामांच्या विविध संधी उपलब्ध होऊ शकतात. यासोबतच वाहतूक, हॉटेल व्यवसाय, विक्री-वितरण आणि अन्य पूरक व्यवसायांनाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
या प्रसंगी उद्योजक कार्तिक लांडगे यांनी उपस्थित राहून सिल्वराईज ग्रुपच्या पुढील वाटचालीसाठी आमदार महेशदादा लांडगे यांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त केल्या. त्यांनी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक उद्योजक संतोष बारणे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. उद्योगविस्ताराच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीला चालना देणारे आणि स्थानिक विकासाला हातभार लावणारे उपक्रम भविष्यातही यशस्वी व्हावेत, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा – विश्वविक्रमी ४११२ ढोलवादकांच्या वतीने महेश सूर्यवंशी यांचा सन्मान!

स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी, उद्योजकांना व्यवसायविस्तारासाठी पोषक वातावरण आणि औद्योगिक क्षेत्राला नवी ऊर्जा देण्याची क्षमता या प्रकल्पात आहे. सिल्वराईज ग्रुपच्या या पुढाकारामुळे चाकणच्या औद्योगिक विकासाला अधिक गती मिळेल आणि परिसराच्या आर्थिक प्रगतीत मोलाची भर पडेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
उद्योगविस्तारातून रोजगार आणि स्थानिक विकासाला बळ!
सिल्वराईज ग्रुपने विविध क्षेत्रांत केलेली प्रगती आणि भविष्यातील औद्योगिक विस्ताराच्या दिशेने टाकलेले पाऊल कौतुकास्पद आहे. उद्योगांच्या माध्यमातून केवळ आर्थिक उलाढाल वाढत नाही, तर रोजगारनिर्मिती, कौशल्यविकास, पूरक व्यवसायांची वाढ आणि परिसराच्या आर्थिक विकासालाही हातभार लागतो. त्यामुळे सिल्वराईज इंडस्ट्रियल पार्कच्या माध्यमातून चाकण परिसरातील औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“औद्योगिक विकासासोबत स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण करणे, हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सिल्वराईज इंडस्ट्रियल पार्कच्या माध्यमातून चाकण परिसरातील उद्योगविस्ताराला चालना देतानाच स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आधुनिक पायाभूत सुविधा, उद्योजकांसाठी पोषक वातावरण आणि रोजगारनिर्मितीच्या माध्यमातून औद्योगिक प्रगतीत मोलाचे योगदान देण्याचा आमचा मानस आहे. भविष्यातही विविध क्षेत्रांत विस्तार करत विकासाच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी सिल्वराईज ग्रुप सातत्याने प्रयत्नशील राहील.”
– संतोष बारणे
व्यवस्थापकीय संचालक, सिल्वराईज ग्रुप




