Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

CJP आंदोलनाची पुढची रणनीती काय? अभिजीत दिपकेंनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले..

नवी दिल्ली | कॅनॉट प्लेस परिसरातील ‘लहरा दो तिरंगा’ मोर्चापूर्वी दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेले ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांची शनिवारी काही अटींसह जामिनावर सुटका करण्यात आली आहे. सुटकेनंतर माध्यमांशी बोलताना दिपकेंनी आपली रोखठोक भूमिका मांडली असून, पोलिसांनी केलेल्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “आंदोलकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असला, तरी आम्ही कोणत्याही दबावाला बळी न पडता हा लढा पूर्ण ताकदीने सुरूच ठेवू,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

अभिजीत दिपके यांनी आंदोलनाची पुढील रणनीती स्पष्ट केली. ते म्हणाले, “सौरव आणि आशु यांची सुटका झाल्यानंतर आम्ही सर्वजण एकत्र बसून पुढील रणनीती आखू. गेल्या काही दिवसांत ज्या प्रकारे बेकायदेशीर अटक आणि स्थानबद्धतेच्या कारवाया झाल्या आहेत, त्यावरून कार्यकर्त्यांमध्ये भीती निर्माण करण्याचा हा स्पष्ट प्रयत्न दिसतोय. मात्र, हा लढा खूप मोठा आणि दीर्घकालीन आहे; आम्ही सर्व परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहोत.” या प्रकरणी पुढील कायदेशीर लढ्यासाठी ते ज्येष्ठ वकील वृंदा ग्रोव्हर यांची भेट घेऊन सल्ला घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा

राखी सावंतच्या अडचणींत मोठी वाढ! तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी अजामीनपात्र वॉरंट जारी

प्रतिबंधात्मक कारवाई आणि सशर्त जामीन

पोलिसांनी जारी केलेल्या प्रतिबंधात्मक नोटीसकडे दुर्लक्ष करत मोर्चा काढण्यावर ठाम राहिल्याने दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली होती. पोलिसांनी त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १२६ आणि १७० अंतर्गत शांतताभंग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. मंदिर मार्ग ठाण्यातील विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केल्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. मात्र, सुटकेसाठी त्यांना सुमारे वर्षभर शांतता राखण्याच्या बंधपत्रावर (Bond) स्वाक्षरी करावी लागली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button