Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

भाजपचे ज्येष्ठ नेते भारतरत्न लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल; छातीत संसर्ग, प्रकृती स्थिर

नवी दिल्ली | भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, देशाचे माजी उपपंतप्रधान आणि भारतरत्न लालकृष्ण अडवाणी (वय ९८) यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना शुक्रवारी संध्याकाळी नवी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत संसर्ग (चेस्ट इन्फेक्शन) झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अडवाणी यांना शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. वृद्धापकाळामुळे उद्भवणाऱ्या आरोग्याच्या तक्रारींमुळे यापूर्वी मे महिन्यातही त्यांना याच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले होते.

हेही वाचा

न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताचे दोन वेगवेगळे एकदिवसीय संघ जाहीर; शुबमन गिल, श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच ७ ऑक्टोबर रोजी अडवाणी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली होती. शासनप्रमुख (गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान) म्हणून यशस्वीपणे २५ वर्षे पूर्ण केल्यानिमित्त मोदींनी अडवाणी यांचे आशीर्वाद घेतले होते. अडवाणी यांचे राष्ट्रीय जीवनातील योगदान अधोरेखित करताना, “त्यांनी सार्वजनिक सेवेतून देशावर अमिट ठसा उमटवला असून भारताच्या प्रगतीमध्ये त्यांची भूमिका निर्णायक ठरली आहे,” अशा शब्दांत मोदींनी त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला होता.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) समर्पित स्वयंसेवक म्हणून सार्वजनिक जीवनाला सुरुवात करणाऱ्या लालकृष्ण अडवाणी यांनी भारतीय जनता पक्षाला राष्ट्रीय पातळीवर प्रस्थापित करण्यात पायाभूत भूमिका बजावली. देशाचे गृहमंत्री आणि माजी उपपंतप्रधान म्हणून त्यांनी दिलेले योगदान अद्वितीय मानले जाते. विशेषतः अयोध्येतील राम मंदिर उभारणीच्या आंदोलनात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्यांच्या या ऐतिहासिक आणि राष्ट्रव्यापी योगदानाबद्दल २०२४ मध्ये त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ देऊन गौरविण्यात आले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button