Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! १५ फूट खोल नाल्यात बस उलटून ८ जणांचा मृत्यू

Kota Bus Accident | दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर शनिवारी पहाटे एक अत्यंत भीषण दुर्घटना घडली. मध्य प्रदेशातील भोपाळहून राजस्थानमधील प्रसिद्ध खाटू श्याम मंदिराकडे भाविकांना घेऊन जाणारी एक ट्रॅव्हल्स बस अनियंत्रित होऊन रस्त्यावरून घसरली आणि थेट १५ फूट खोल नाल्यात कोसळली. या भीषण अपघातात लहान मुले आणि वृद्धांसह किमान आठ भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर १७ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एक्सप्रेसवेवरील पोल क्रमांक ३८४ जवळ शनिवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या बसमध्ये एकूण २५ प्रवासी प्रवास करत होते. प्राथमिक अंदाजानुसार, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव बस रस्त्यावरून घसरून नाल्यात उलटली. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा

‘सत्तांतराची स्वप्ने ठराविक राज्यांतच का?’ संजय राऊतांवर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा पलटवार

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि आपत्कालीन बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेऊन तातडीने मदतकार्य सुरू केले. मात्र, नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चिखल, गाळ आणि पाणी साचलेले असल्याने जखमींना आणि मृतदेहांना बाहेर काढण्यात मोठे अडथळे येत होते. अखेर प्रशासनाने क्रेन पाचारण करून क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त बस खड्ड्यातून बाहेर काढली.

जिल्हाधिकाऱ्यांकडून रुग्णालयाला भेट; जखमींवर उपचार सुरू

कोटाचे जिल्हाधिकारी पीयूष समारीया यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातातील १७ जणांना न्यू मेडिकल कॉलेज हॉस्पिटल (NMCH) मध्ये, तर आठ जणांना एमबीएस (MBS) हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यापैकी NMCH रुग्णालयात आणलेल्या सात जणांना आणि एमबीएस रुग्णालयात आणलेल्या एका व्यक्तीला डॉक्टरांनी मृत घोषित केले. जिल्हाधिकारी समारीया यांनी पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत दोन्ही रुग्णालयांना भेट देऊन जखमींच्या प्रकृतीचा आढावा घेतला आणि त्यांना तातडीने योग्य ते उपचार देण्याचे निर्देश दिले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group