TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

Air India Flight Emergency Landing: एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बची धमकी? फ्रँकफर्ट-दिल्ली विमान जयपूरला वळवले

बोईंग ७८७-९ विमान जयपूर विमानतळावर सुरक्षित उतरले; स्वतंत्र ठिकाणी ठेवून सुरक्षा यंत्रणांकडून तपासणी सुरू

जयपूर : फ्रँकफर्टहून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान १४ ऑक्टोबर रोजी सुरक्षेच्या कारणास्तव जयपूरकडे वळवण्यात आले. पीटीआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, हे विमान जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. विमानाला बॉम्बची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली असून, त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी तपासणी सुरू केली आहे.

विमान स्वतंत्र ठिकाणी ठेवले

बोईंग ७८७-९ प्रकारच्या विमानाद्वारे चालवले जाणारे एअर इंडियाचे ‘AI2030’ हे विमान जयपूर विमानतळावर उतरल्यानंतर सुरक्षा तपासणीसाठी आयसोलेशन बे अर्थात विमानतळावरील स्वतंत्र ठिकाणी नेण्यात आले.

मालवीय नगरचे सहाय्यक पोलीस आयुक्त शिव दयाल यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, विमानाला बॉम्बची धमकी मिळाल्यामुळे फ्रँकफर्ट-दिल्ली विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाने पोलिसांना दिली होती. त्यानंतर संबंधित यंत्रणांनी तपासणी सुरू केली.

हेही वाचा –  महामार्ग रोकोचा कोल्हापूरला दुहेरी फटका! भाजीपाला महागला, शंभरहून अधिक एसटी बस रद्द; हजारो ट्रक अडकले

‘स्कॉक कोड ७५००’ सक्रिय केल्याची माहिती

पीटीआयच्या वृत्तानुसार, विमान मुंबई फ्लाइट इन्फॉर्मेशन रिजन (FIR) मध्ये असताना वैमानिकाने ‘स्कॉक कोड ७५००’ (Squawk Code 7500) सक्रिय केला होता. विमानातील बेकायदेशीर हस्तक्षेप किंवा अपहरणासारख्या परिस्थितीचा संकेत देण्यासाठी हा कोड वापरला जातो.

मात्र, या कोडच्या वापराचा नेमका संदर्भ आणि विमानाला मिळालेल्या धमकीचे स्वरूप याबाबत अधिकृत तपशील स्पष्ट होणे बाकी आहे. जयपूर विमानतळावर विमानाची सुरक्षा तपासणी सुरू असून, पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button