Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

“हिंमत असेल तर पूर्ण व्हिडीओ दाखवा!”; अभिजीत दिपकेंचे दिल्ली पोलिसांना थेट आव्हान

नवी दिल्ली | मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन छेडणाऱ्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे (CJP) प्रमुख अभिजीत दिपके यांनी सुटकेनंतर दिल्ली पोलिसांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. पत्रकार परिषदेत पोलिसांनी जारी केलेला व्हिडीओ हा ‘एडिटेड’ (कापछाप केलेला) असल्याचा दावा करत, हिंमत असेल तर संपूर्ण व्हिडीओ जनतेसमोर आणावा, असे खुले आव्हान दिपकेंनी दिले आहे. तसेच कोठडीत असताना पहाटे ३.३० वाजता झोपेतून उठवून अटकेच्या कागदपत्रांवर सही करण्यासाठी दबाव आणला गेल्याचा खळबळजनक खुलासा त्यांनी केला आहे.

दिल्ली पोलिसांनी दाखवलेल्या व्हिडीओवर आक्षेप घेत दिपके म्हणाले, “दिल्ली पोलिसांत हिंमत असेल तर मी पोलीस ठाण्यात असतानाचा संपूर्ण व्हिडीओ जाहीर करा. त्यामध्ये मी वारंवार भावाशी आणि वकिलांशी दोन मिनिटे बोलण्यासाठी फोन मागत होतो, हे स्पष्ट दिसेल. कोणत्याही नागरिकाला ताब्यात घेतल्यावर वकिलांशी संपर्क साधू देणे हा त्याचा मूलभूत अधिकार आहे. पण पोलिसांनी तोही नाकारला. आता मात्र आजीच्या निधनाचे कारण पुढे करून आम्हीच त्याला घरी जाण्यास सांगितले, असा खोटा आव आणत सोयीस्कर एडिट केलेला व्हिडीओ दाखवला जात आहे.”

हेही वाचा

दिव्या क्लासेसच्या वर्धापन दिनानिमित्त मोशीत वृक्षारोपण सोहळा उत्साहात!

पहाटेच्या प्रसंगाची आपबिती सांगताना दिपके म्हणाले, “पोलिसांना मला घरीच पाठवायचे होते, तर मग रात्री साडेतीन वाजता माझ्याकडे अटकेची कागदपत्रे का आणली? मला झोपेतून उठवून सांगण्यात आले की, ‘हे तुझे अरेस्ट पेपर्स आहेत, तू दीर्घकाळ तुरुंगात जाणार आहेस, यावर सही कर.’ मी वकिलांशी बोलल्याशिवाय सही करणार नाही म्हटल्यावर त्यांनी दबाव आणला. इतकेच नाही तर आई-वडिलांना फोन करून तू दीर्घकाळ तुरुंगात जाणार असल्याचे सांगण्यास भाग पाडले.”

दिवसभर आपल्याला कुठे ठेवले याची माहिती ना कुटुंबीयांना दिली, ना वकिलांना; असा आरोप करत “दिल्ली पोलिसांनी माझ्यावर आणि माझ्या आई-वडिलांवर तीव्र मानसिक अत्याचार केला. साध्या माणुसकीचीही चाकोरी पोलिसांनी ओलांडली,” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button