Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडीराष्ट्रिय

“डियर प्राइम मिनिस्टर अंबानी!”; ‘स्टारलिंक’च्या मुद्द्यावरून एलॉन मस्क यांचा थेट मुकेश अंबानींवर निशाणा

नवी दिल्ली | उपग्रह इंटरनेट सेवा (Satellite Internet) देणाऱ्या ‘स्टारलिंक’च्या (Starlink) भारतातील प्रवेशावरून सुरू असलेल्या वादाने आता अत्यंत टोकदार वळण घेतले आहे. टेस्ला आणि स्पेसएक्सचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी आता थेट रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्यावर उपरोधिक शब्दांत निशाणा साधला आहे. अंबानींना चक्क “डियर प्राइम मिनिस्टर” (आदरणीय पंतप्रधान) असे संबोधत, अधिकृत संवैधानिक पदापेक्षाही जास्त सत्ता आणि ताकद अंबानींकडे असल्याचा खोचक टोला मस्क यांनी लगावला आहे.

शुक्रवारी केलेल्या पहिल्या पोस्टनंतर सलग तिसऱ्या दिवशी सोशल मीडिया मंच ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) व्यक्त होताना मस्क म्हणाले, “भारताचे खरे बॉस तुम्हीच आहात ही बाब वेळेत लक्षात न आल्याबद्दल कृपया माझी दिलगिरी स्वीकारा.” यासोबतच त्यांनी सवाल केला की, “अंबानी स्टारलिंकला भारतीय बाजारपेठेत खुल्या आणि निष्पक्ष स्पर्धेत उतरू देणार का? की भारतीय जनतेचे मक्तेदारीतून होणारे शोषण त्यांना असेच सुरू ठेवायचे आहे?”

हेही वाचा

दिल्ली विमानतळावर हायव्होल्टेज ड्रामा! अभिजीत दिपकेंना थेट विमानातूनच पोलिसांनी घेतले ताब्यात

भारतातील दुर्गम आणि ग्रामीण भागाचा उल्लेख करत मस्क म्हणाले, “अनेक ग्रामीण भागांत अजूनही इंटरनेट सुविधा नाही. त्यामुळे लहान मुलांचे शिक्षण थांबते आणि छोट्या व्यावसायिकांना जागतिक बाजारपेठ गाठता येत नाही. स्टारलिंक अशा घटकांच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते. तसेच नैसर्गिक आपत्तींच्या वेळी जेव्हा पारंपरिक मोबाइल टॉवर कोसळतात, तेव्हा उपग्रह इंटरनेट लोकांचे प्राण वाचवू शकते.” जगभरातील १६५ हून अधिक देशांत परवाने मिळूनही भारतात ५ वर्षांपासून सर्व नियमांचे पालन करूनही परवाना का रोखला जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राहुल गांधींचाही पाठिंबा

या वादात आता विरोधी पक्षांनीही उडी घेतली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एलॉन मस्क यांच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा दिला आहे. “काँग्रेस पक्ष क्रोनी कॅपिटलिझमच्या (भांडवलशाहीच्या संगनमताच्या) दुष्टचक्राचा बिमोड करण्यासाठी कटिबद्ध आहे. मी व्यवसायांच्या विरोधात नसून, एकाधिकारशाहीच्या विरोधात आहे. बाजारात सर्वांना समान संधी मिळायला हवी,” असे राहुल गांधींनी स्पष्ट केले. यापूर्वी मस्क यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना, “भारतात स्वागत आहे एलॉन, दुसऱ्या व्यक्तीची ओळख होईपर्यंत वाट पाहा,” असा टोलाही त्यांनी लगावला होता.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button