Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

पोलिसांशी धक्काबुक्की केल्याप्रकरणी राहुल-प्रियांका गांधींवर ३ गुन्हे दाखल

नवी दिल्ली | मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आणि मतदार याद्यांच्या कथित फेरतपासणीविरोधात विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ (INDIA) आघाडीने दिल्लीत पुकारलेल्या आंदोलनाला बुधवारी हिंसक वळण लागले. आंदोलनादरम्यान पोलिसांशी कथित झटापट, धक्काबुक्की आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी-वाड्रा यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी किमान तीन नवे ‘एफआयआर’ (FIR) दाखल केले आहेत. या कारवाईमुळे दिल्लीतील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.

मंगळवारच्या आंदोलनानंतर बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी सर्व विरोधी खासदारांनी आक्रमक पवित्रा घेतला. दुपारच्या भोजनानंतर कनॉट प्लेस येथील सागर रत्ना रेस्टॉरंटमधून विरोधी पक्षांचे खासदार बसेसमधून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे निघाले होते. मात्र, विंडसर पॅलेसजवळ पोलिसांनी बॅरिकेड्स लावून या बसेस अडवल्या. यानंतर संतप्त झालेले सर्व खासदार खाली उतरले आणि त्यांनी रस्त्यावरच बैठक मारत ठिय्या आंदोलन सुरू केले. प्रियांका गांधी हातात संविधानाची प्रत घेऊन रस्त्यावर बसल्या होत्या. पोलिसांनी आंदोलक खासदारांना पांगवण्याचा प्रयत्न केला असता, राहुल गांधींनी पोलिसांना रोखत, “ही माझी बहीण आहे,” असे म्हणत आक्रमक विरोध दर्शवला.

हेही वाचा

पुणे जिल्हा फुटबॉल स्पर्धेत RKL Galaxy International School च्या मुलींची चमकदार कामगिरी!

खासदारांना ताब्यात घेताना आंदोलक आणि पोलीस पथकामध्ये मोठी धक्काबुक्की झाली. या गोंधळात कॉन्स्टेबल अंकित कसाना हे जखमी झाले. “मी माझे कर्तव्य बजावत होतो, यात माझी काय चूक?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, या कारवाईत तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या चेहऱ्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली असून त्या रक्तबंबाळ झाल्याचे पाहायला मिळाले.

सरकारी कामात अडथळा, पोलिसांवर हल्ल्याचे गुन्हे दाखल

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आंदोलनादरम्यान सरकारी कामात अडथळा आणणे, सुरक्षारक्षकांवर हल्ला करणे आणि प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह इतर काही आंदोलकांवर तीन स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button