Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

अमेरिकेत AI चे नाव बदलले; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ‘SIF’ ची स्थापना

Donald Trump | कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) जागतिक शर्यतीत अमेरिकेचे वर्चस्व कायम राखण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. व्हाईट हाऊसमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांच्या सीईओंबरोबर झालेल्या बैठकीनंतर ट्रम्प यांनी ‘एआय’चे (Artificial Intelligence) नाव अधिकृतपणे बदलून ‘एसआय’ (Super Intelligence – SI) केले आहे. यापाठोपाठ आता त्यांनी देशात एका विशेष ‘सुपर इंटेलिजन्स फोर्स’च्या (SIF) स्थापनेची घोषणा केली आहे. या उपक्रमाचे वर्णन त्यांनी औद्योगिक आणि इंटरनेट क्रांतीपेक्षाही मोठे पाऊल असे केले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत या नव्या दलाच्या स्थापनेची सविस्तर माहिती दिली. ट्रम्प म्हणाले की, “व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या ऐतिहासिक करारानंतर मी ‘सुपर इंटेलिजन्स फोर्स’ची घोषणा करत आहे. तंत्रज्ञान विश्वातील ही क्रांती औद्योगिक क्रांतीपेक्षा मोठी ठरणार आहे. हे दल सर्वसामान्य नागरिक, धार्मिक संस्था, महत्त्वाच्या पायाभूत सुविधा पुरवणारे घटक आणि एसआय कंपन्या यांच्यात फेडरल सरकारचा समन्वय साधण्याचे काम करेल. ही फोर्स थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि व्हाईट हाऊसच्या ‘चीफ ऑफ स्टाफ’ यांना आपला अहवाल सादर करेल.”

हेही वाचा

तुकाराम मुंढेंच्या FDA कारवाईची राज्यभर चर्चा; २१ वर्षांत २५ बदल्यांनंतर पुन्हा चर्चेत आले अधिकारी

‘एआय’चे नाव बदलून ‘एसआय’ का केले?

अमेरिकन प्रशासनाने आता अधिकृतपणे ‘एआय’ ऐवजी ‘एसआय’ (सुपर इंटेलिजन्स) या शब्दाचा वापर सुरू केला आहे. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या संज्ञेपेक्षा ‘सुपर इंटेलिजन्स’ हा शब्द तंत्रज्ञानाची खरी ताकद, भविष्यातील प्रचंड क्षमता आणि वेग अधिक प्रभावीपणे दर्शवतो, असा दावा ट्रम्प यांनी केला. या नामकरणाच्या अधिकृत प्रस्तावावर ट्रम्प यांनी स्वाक्षरीही केली असून, तंत्रज्ञान क्षेत्रात अमेरिकेचे जागतिक नेतृत्व अबाधित ठेवणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button