Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

CBIचे माजी अंतरिम संचालक एम. नागेश्वर राव यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश

M. Nageswara Rao | केंद्रीय अन्वेषण विभागाचे (CBI) माजी अंतरिम संचालक एम. नागेश्वर राव यांनी सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था आणि प्रशासकीय सेवेतील चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीनंतर अखेर सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसी (काशी) येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात त्यांनी ‘सर्वजन सनातन पार्टी’च्या (SSP) राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे अधिकृतपणे स्वीकारली.

अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर बोलताना एम. नागेश्वर राव म्हणाले, “केवळ प्रशासकीय सुधारणा करून भारताची पुनर्उभारणी शक्य नाही. देशाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरतानाच आपल्या हजारो वर्षांच्या नागरी संस्कृती आणि मूल्यांशी जोडलेले राहणे तितकेच गरजेचे आहे.”

हेही वाचा

मराठी लोकसंस्कृतीचा सुरेल ‘अंतर्नाद – अ जर्नी टू द सोल’ ने रसिकांना केले अंतर्मुख!

पक्षाची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, “आम्हाला भूतकाळात अडकून राहायचे नाही, तर समृद्ध वारशाच्या पायावर एका आधुनिक भारताची उभारणी करायची आहे. ‘सनातन’ ही केवळ निवडणुकीपुरती घोषणा नसून शिक्षण, आरोग्य, शासन आणि समाजकारणात या मूल्यांचे प्रत्यक्ष प्रतिबिंब उमटले पाहिजे.” मंदिरे व तीर्थक्षेत्रे ही केवळ पूजास्थळे न राहता ती भारतीय संस्कृतीची जिवंत केंद्रे म्हणून विकसित झाली पाहिजेत, असा विचारही त्यांनी मांडला. तसेच सनातन विचार हा कोणा एका विशिष्ट जाती किंवा समुदायाच्या विरोधात नसून समाजातील सर्व घटकांना जोडणारा आणि सर्वसमावेशक विकासाला प्राधान्य देणारा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पक्षाचे चार मुख्य आधारस्तंभ:

  • शिक्षण : भारतीय इतिहास, संस्कृती आणि पारंपरिक ज्ञानाचा आधुनिक व जागतिक दर्जाच्या शिक्षणाशी समन्वय साधणे.
  • आरोग्य : ॲलोपॅथीसह भारतीय पारंपरिक वैद्यक पद्धतींचा मिलाफ घडवून सर्वांसाठी परवडणाऱ्या आरोग्य सुविधा उपलब्ध करणे.
  • रोजगार व उपजीविका : युवक, शेतकरी, कारागीर, कामगार आणि लघुउद्योजकांसाठी सन्मानजनक उपजीविकेच्या संधी निर्माण करणे.
  • सांस्कृतिक पुनर्जागरण : देशातील प्रादेशिक भाषा, कला, मंदिरे, सण-उत्सव आणि कौटुंबिक मूल्यांचे संवर्धन करून राष्ट्र उभारणीला गती देणे.

वाराणसी येथील या सोहळ्याला पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष महंत तीर्थानंद, उपाध्यक्षा रितू राठोड, सरचिटणीस राजा सक्षम सिंग योगी, प्रवक्त्या बबिता शर्मा, उत्तर प्रदेश प्रभारी राकेश तिवारी आणि संघटनमंत्री नरनारायण सिंग यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group