आर.के.एल. गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची ‘गोल्डन बेल्ट कराटे स्पर्धेत’ देदीप्यमान कामगिरी
आर्य कांबळेला सुवर्णपदकासह 'बेस्ट फायटर अवॉर्ड', तर मानसी कांबळेला रौप्य पदक

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
आर.के.एल. गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट क्रीडाकौशल्याच्या जोरावर पुन्हा एकदा शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे. नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय ‘गोल्डन बेल्ट कराटे चॅम्पियनशिप’मध्ये (Golden Belt Karate Competition) शाळेच्या आर्य कांबळे आणि मानसी कांबळे यांनी दैदिप्यमान कामगिरी करत भरघोस यश संपादन केले.
या स्पर्धेत आर्य राजू कांबळे याने आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत सुवर्णपदक (Gold Medal) आणि स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा ‘बेस्ट फायटर अवॉर्ड’ पटकवला. तर मानसी कांबळे हिने अत्यंत चुरशीच्या सामन्यात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत रौप्यपदकावर (Silver Medal) आपले नाव कोरले. दोन्ही विद्यार्थ्यांच्या या यशामुळे क्रीडा क्षेत्रात आणि परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
हेही वाचा
एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या सक्षम जाधवची तलवारबाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल बोलताना आर.के.एल. गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूलचे सीईओ डॉ. पुष्कर चोबे आणि सीओओ मित्तल शहा यांनी दोन्ही गुणवंत खेळाडूंचे मनापासून अभिनंदन केले. “विद्यार्थ्यांची मेहनत, धैर्य, अनुशासन आणि खेळाप्रती असलेले समर्पण यामुळेच हे मोठे यश शक्य झाले आहे. आर.के.एल. गॅलेक्सी स्कूल नेहमीच अभ्यासासोबतच क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देते,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
तसेच शाळेच्या प्राचार्या, व्यवस्थापन मंडळ (मॅनेजमेंट) आणि सर्व शिक्षकवृंद यांनी आर्य आणि मानसी यांचे अभिनंदन करत त्यांना भविष्यातील वाटचालीस आणि उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.





