अभिनेत्री नुसरत भरुचाचा बालीमध्ये भीषण अपघात; एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईत आणले

Nushrratt Bharuccha | बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा हिचा इंडोनेशियातील बाली येथे भीषण अपघात झाला असून, तिच्या पाठीच्या कण्याला (मणक्याला) गंभीर दुखापत झाली आहे. उपचारांसाठी आणि मणक्यावरील शस्त्रक्रियेसाठी तिला तातडीने एअर ॲम्ब्युलन्सद्वारे बालीहून मुंबईत आणण्यात आले आहे. सोशल मीडियावर सध्या नुसरतचा एक व्हिडीओ समोर आला असून, त्यामध्ये ती ऑक्सिजन सपोर्टवर असल्याचे दिसत आहे. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात तिच्यावर लवकरच शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नुसरत एका प्रोजेक्टच्या कामानिमित्त बाली येथे गेली होती. काम पूर्ण झाल्यानंतर ती तिथे सुट्ट्यांचा आनंद घेत होती; मात्र त्याच दरम्यान तिचा भीषण अपघात झाला. या अपघातात तिच्या मणक्याला फ्रॅक्चर झाले. बालीमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील गंभीर शस्त्रक्रियेसाठी तिला एअरलिफ्ट करून तातडीने मुंबईत आणण्यात आले.
हेही वाचा
#WATCH | Mumbai, Maharashtra: Actor Nushrratt Bharuccha, who was in Bali for a work-cum-holiday trip, suffered a spinal fracture in an accident and is currently hospitalised under medical observation. She is set to undergo spine surgery and is being brought back to Mumbai via air… pic.twitter.com/QwGLIQ118N
— ANI (@ANI) October 2, 2026
मुंबई विमानतळावर दाखल झाल्यानंतरचे तिचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये नुसरतला स्ट्रेचरवरून आणले जात असल्याचे दिसते. ती शुद्धीवर असली तरी तिला ऑक्सिजन सपोर्ट देण्यात आला असून, दुखापतीमुळे तिला तीव्र वेदना होत असल्याचे स्पष्ट जाणवत आहे.
यापूर्वी नुसरतच्या टीमने तिच्या दुखापतीबाबत अधिकृत माहिती दिली होती. “गंभीर दुखापत आणि शस्त्रक्रियेमुळे नुसरतला पूर्णपणे बरे होण्यासाठी विश्रांतीची गरज भासणार आहे. त्यामुळे तिच्या आगामी प्रोजेक्ट्सच्या वेळापत्रकावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे,” असे टीमकडून सांगण्यात आले होते. नुसरत सध्या मुंबईत दाखल झाली असून, तिच्या मणक्यावरील शस्त्रक्रिया नेमकी कधी होणार, याबाबत अधिक तपशील अद्याप समोर आलेला नाही.





