Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! १२ चाकी ट्रकने पिकअपला उडवले; ७ तरुणांचा मृत्यू, ३ गंभीर

Samruddhi Expressway Accident | आगामी दुर्गोत्सवासाठी शेगावहून दुर्गामातेची मूर्ती घेऊन वर्ध्याकडे परतणाऱ्या तरुणांच्या वाहनाचा आज पहाटे भीषण अपघात झाला. एका भरधाव १२ चाकी अजस्त्र ट्रकने बोलेरो पिकअप वाहनाला जोरदार धडक दिली. या हृदयद्रावक अपघातात ७ तरुणांचा जागीच व उपचारादरम्यान मृत्यू झाला असून २२ पैकी तिघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. जखमींवर सावंगी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण वर्धा शहरावर शोककळा पसरली आहे.

अपघातात ५ जणांचा जागीच तर २ जणांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. घनश्याम पाटील, प्रवीण बकाने, गोलू बादलगवार, ओम गावंडे, दत्ताजी खुरसागे, रोशन राऊत आणि मुनेश्वर ढोले अशी मृत तरुणांची नावे आहेत.

जखमींमध्ये दिनेश नानवटे, सागर ढोले, प्रतीक सिरस्कार, दुर्गेश भिसे, अनिल मसराम, प्रणय ढोले, यश मलकापूरे, सतीश खाडे, सतीश राऊत, पवन ढोले, नंदकिशोर सिरस्कार, नरेंद्र सोयाम, नयन खानझोड, शिवम राऊत, दिनेश पोहणकर, अमित ठाकरे, अमित आडे आणि आर्यन वैद्य यांचा समावेश आहे. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असून एका गंभीर जखमीला पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात येत असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिकारी सुशांत वानखेडे यांनी दिली.

हेही वाचा

‘भविष्यवेधी तंत्रज्ञानाला मानवी चेहरा असावा’; AIचा लाभ समाजातील अंतिम व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचे राज्यपालांचे आवाहन

गावाजवळ पोहोचताच काळाचा घाला

हे सर्व तरुण २० ते २५ वर्षे वयोगटातील असून वर्ध्यातील एका लोकप्रिय दुर्गा उत्सव मंडळाचे कार्यकर्ते होते. हे मंडळ यंदा ८ वे वर्ष साजरे करत होते. २८ सप्टेंबर रोजी ही तरुण मंडळी १४ फूट उंचीची मूर्ती आणण्यासाठी शेगावला गेली होती. ३० सप्टेंबर रोजी बोलेरो पिकअप वाहनाने त्यांचा परतीचा प्रवास अत्यंत काळजीपूर्वक सुरू झाला. महामार्गावर मूर्ती सुरक्षित राहावी म्हणून वाहन केवळ ५ च्या वेगाने अत्यंत संथ गतीने रस्त्याच्या एका बाजूने चालवले जात होते. मात्र, गावानजीक पोहोचत असतानाच एका भरधाव १२ चाकी ट्रकने त्यांच्या वाहनाला पाठीमागून भीषण धडक दिली आणि होत्याचे नव्हते झाले.

गेल्या पाच वर्षांपासून हे मंडळ समृद्धी महामार्गानेच सुरक्षितपणे मूर्ती आणत होते. यंदाही अत्यंत दक्ष राहून प्रवास केला जात होता, मात्र अगदी गावाजवळच काळाने घाला घातल्याने या उत्साही तरुणांचा भक्तिमय प्रवास दुःखात विलीन झाला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button