Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडीराष्ट्रिय

‘कॅप्टन स्मित मच्छार हे देशाचे खरे हिरो’; फ्लायदुबई विमानात १८० प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या भारतीय पायलटचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक

नवी दिल्ली | दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या ‘फ्लायदुबई’च्या विमानात कॉकपिटमध्ये घडलेल्या थरारक आणि जीवघेण्या प्रसंगात स्वतः गंभीर जखमी असतानाही १८० हून अधिक प्रवाशांचे प्राण वाचवणारे भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष कौतुक केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत पंतप्रधानांनी कॅप्टन मच्छार यांना ‘रिअल हिरो’ (खरे नायक) संबोधत त्यांच्या अद्भूत शौर्याला सलाम केला आहे.

पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, “कॅप्टन मच्छार हे खरे हिरो आहेत. सर्वात मोठ्या संकटाचा सामना करताना आणि स्वतः गंभीर जखमी झालेले असतानाही कॅप्टन स्मित मच्छार यांनी इतरांचे प्राण वाचवण्यासाठी अपार धैर्य आणि दृढनिश्चय दाखवला. त्यांच्या या शौर्यामुळे शेकडो निष्पाप प्रवाशांचे प्राण वाचले असून एक मोठा अनर्थ टळला आहे. संपूर्ण भारताला कॅप्टन मच्छार यांचा सार्थ अभिमान आहे. ते लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावेत आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभावे, हीच प्रार्थना.”

हेही वाचा

शुबमन गिलचा ऐतिहासिक विश्वविक्रम; अवघ्या ११७ चेंडूंत झळकावले वनडे इतिहासातील सर्वात जलद द्विशतक

कॉकपिटमधील थरार अन् मोठा अनर्थ टळला

दुबईहून तेल अवीवच्या दिशेने १५० हून अधिक इस्रायली नागरिकांसह प्रवास करणाऱ्या बोईंग ७३७ विमानात उड्डाणादरम्यान कॉकपिटमध्ये अचानक गंभीर संघर्ष उद्भवला. एका वैमानिकाकडून घातपाताचा किंवा दहशतवादी हल्ल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या जीवघेण्या झटापटीत गंभीर जखमी असतानाही कॅप्टन मच्छार यांनी विमानाचे नियंत्रण राखले, इमर्जन्सी कोड सक्रिय केले आणि सौदी अरेबियातील ताबूक विमानतळावर सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग घडवून आणले. यामुळे लहान मुलांसह विमानातील सर्व प्रवाशांचा आणि क्रू सदस्यांचा जीव थोडक्यात बचावला.

भारतीय दूतावासाचे तबुकमधील उपचारांवर लक्ष

सौदी अरेबियातील भारतीय दूतावास कॅप्टन स्मित मच्छार यांच्या प्रकृतीवर सातत्याने बारीक लक्ष ठेवून आहे. दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर-पश्चिम सौदी अरेबियातील ताबूक शहरातील एका रुग्णालयात त्यांच्यावर आवश्यक ते वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. दूतावास स्थानिक प्रशासनाशी आणि कॅप्टन मच्छार यांच्या कुटुंबीयांशी सातत्याने संपर्कात असून त्यांना सर्वतोपरी सहकार्य पुरवले जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button