Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

युवकांनी रोजगाराच्या संधींचा लाभ घेत कौशल्ये विकसित करावीत; मंगल प्रभात लोढांचा तरुणांना सल्ला

वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये ‘विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ’; १,००० हून अधिक युवकांची उपस्थिती, १०० पेक्षा अधिक स्टॉल्स

मुंबई : बदलत्या रोजगाराच्या संधींचा लाभ घेण्यासाठी युवकांनी उद्योगांच्या गरजेनुसार आवश्यक कौशल्ये आत्मसात करावीत, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. एमव्हीआयआरडीसी वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे आयोजित रोजगार मेळाव्याला भेट देत त्यांनी सहभागी युवकांशी संवाद साधला.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर आणि एमव्हीआयआरडीसी वर्ल्ड ट्रेड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ’ अंतर्गत या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

यावेळी एमव्हीआयआरडीसी वर्ल्ड ट्रेड सेंटरचे अध्यक्ष तसेच ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉ. विजय कलंत्री यांनी मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे स्वागत केले. लोढा यांनी रोजगार मेळाव्यातील विविध स्टॉल्सना भेट देत नियोक्ते, कौशल्य विकास संस्था आणि सहभागी युवकांशी संवाद साधला.

हेही वाचा –  एसबीपीसीओएडी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

तरुणांना रोजगाराच्या बदलत्या स्वरूपाशी जोडण्यासाठी कौशल्य विकासाला विशेष महत्त्व आहे. उद्योग क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन युवकांनी आपल्या कौशल्यांमध्ये सातत्याने सुधारणा करणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार आणि विविध क्षेत्रातील नियोक्ते यांना थेट एकाच व्यासपीठावर आणणे हा या रोजगार मेळाव्याचा प्रमुख उद्देश आहे. रोजगाराच्या संधी, कौशल्य विकास आणि उद्योगांच्या गरजा यांच्यातील दरी कमी करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

या रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १,००० हून अधिक अभ्यागतांनी मेळाव्याला भेट दिली, तर नियोक्ते, कौशल्य विकास संस्था आणि सहभागी संस्थांचे १०० हून अधिक स्टॉल्स उभारण्यात आले होते. त्यामुळे युवकांना विविध रोजगार आणि कौशल्यविकासाच्या संधींची थेट माहिती मिळाली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button