Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण: सचिन वाझेला जामीन मंजूर

मुंबई | उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवल्याचे प्रकरण आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी, माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे याला मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. २०२१ मध्ये अटक झाल्यापासून सचिन वाझे गेल्या साडेपाच वर्षांपासून तुरुंगात होता.

२५ फेब्रुवारी २०२१ रोजी ‘अँटिलिया’ इमारतीबाहेर जिलेटिनच्या कांड्या असलेली एक स्कॉर्पिओ गाडी बेवारस स्थितीत आढळली होती. या घटनेने देशभरात प्रचंड खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर काही दिवसांतच, ५ मार्च २०२१ रोजी या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्याजवळील खाडीत संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपवण्यात आल्यानंतर सचिन वाझेला अटक करण्यात आली होती. गंभीर आरोपांनंतर वाझेला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते.

हेही वाचा

प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे अग्निसुरक्षा प्रशिक्षण व मॉक ड्रील संपन्न


या प्रकरणातील इतर काही सहआरोपींना यापूर्वीच जामीन मिळालेला आहे. आज (२९ सप्टेंबर) विशेष एनआयए न्यायालयाने वाझेचाही जामीन अर्ज मंजूर केल्याने तो दीर्घ तुरुंगवासानंतर बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button