Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

नेमबाजीत भारताचा नवा इतिहास! नीरू धांडाने ट्रॅप प्रकारात जिंकले ऐतिहासिक सुवर्णपदक

Asian Games 2026 | आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय नेमबाजांचा दबदबा कायम असून, स्टार नेमबाज नीरू धांडा हिने नेमबाजीच्या इतिहासात नव्या सुवर्णअक्षरांनी आपले नाव कोरले आहे. महिलांच्या वैयक्तिक ट्रॅप नेमबाजी प्रकारात नीरूने ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या क्रीडा प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदक पटकावणारी ती पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. नीरूच्या या ऐतिहासिक यशाने भारताची तब्बल ३६ वर्षांची प्रदीर्घ पदकाची प्रतीक्षा संपली आहे.

अंतिम फेरीत नीरू धांडाने कमालीची एकाग्रता दाखवत ३० पैकी तब्बल २८ लक्ष्यांवर अचूक निशाणा साधला. या अविश्वसनीय कामगिरीसह तिने सुवर्णपदक तर जिंकलेच, शिवाय नवा आशियाई विक्रमही प्रस्थापित केला. यापूर्वी हा आशियाई विक्रम चिनी तैपेईच्या वान यू लियू हिच्या नावावर होता, जिने २४ गुणांसह तो नोंदवला होता. नीरूने हा जुना विक्रम मोठ्या फरकाने मागे टाकत नवा इतिहास रचला. अंतिम फेरीत चीनच्या यूनॉन्ग सुन हिने ३० पैकी २६ अचूक नेम साधून रौप्यपदक मिळवले.

हेही वाचा

चाकण-हिंजवडीतील वाहतूक व नागरी सुविधांसाठी एकात्मिक आराखड्यास मंजुरी

३६ वर्षांचा दुष्काळ संपवला

आशियाई क्रीडा स्पर्धेत १९९० मध्ये बीजिंग येथे महिलांच्या शॉटगन ट्रॅप वैयक्तिक प्रकाराचा पहिल्यांदा समावेश करण्यात आला होता. तेव्हापासून आजवर झालेल्या कोणत्याही आशियाई क्रीडा स्पर्धेत या प्रकारात भारताला एकही पदक जिंकता आले नव्हते. २०२६ च्या ऐची-नागोया स्पर्धेत नीरू धांडाने ही ३६ वर्षांची पदकाची प्रतीक्षा थेट ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून संपवली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button