सोशल मीडियावर तानिया मिश्राची चर्चा; ‘नॅशनल क्रश’ म्हणून चाहते देतायत पसंती
मॉडेलिंगपासून अभिनयापर्यंतचा प्रवास; ‘चिडिया उड’सह म्युझिक व्हिडिओ आणि विविध प्रोजेक्टमधून मिळवली ओळख

Tanyaa Mishra National Crush : मॉडेल आणि अभिनेत्री तानिया मिश्रा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. तिचे ग्लॅमरस फोटो आणि फॅशन स्टाइल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लक्ष वेधून घेत आहेत. चाहत्यांकडून तिला ‘नॅशनल क्रश’ म्हणून संबोधलं जात असून, तिच्या लूकसोबतच मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रातील कामाचीही चर्चा होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तानियाचे इन्स्टाग्रामवर सुमारे 1.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावरील लोकप्रियतेमुळे तानिया मिश्रा नेमकी कोण आहे आणि तिचा आतापर्यंतचा प्रवास कसा राहिला आहे, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
बिहारमधून मुंबईपर्यंतचा प्रवास
तानिया मिश्रा ही मूळची बिहारमधील गया जिल्ह्याची असल्याची माहिती आहे. तिचा जन्म 31 जानेवारी 1999 रोजी झाला. तिने मगध विद्यापीठातून बी.कॉमचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणानंतर तिने मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल ठेवले आणि त्यानंतर अभिनयाकडे वळली.
मॉडेलिंग क्षेत्रात काम करताना तानिया Femina, Filmfare आणि Grazia यांसारख्या प्रसिद्ध मॅगझिनमध्ये झळकली आहे. एप्रिल-मे 2025 च्या Femina कव्हरवरही ती दिसली होती. सौंदर्य स्पर्धांमध्येही तिने सहभाग घेतला आहे. Miss India 2019 स्पर्धेत तिने चौथा क्रमांक मिळवल्याचे सांगितले जाते.
हेही वाचा – नीलम गोऱ्हेंच्या पुण्यातील निवासस्थानी पहाटे घुसखोरी; बॅगेत हातोडा, दोरी अन् हातमोजे सापडल्याचा दावा
पुरस्कारांनीही सन्मान
तानियाला Femina Achievers Award 2024 आणि Lokmat Award 2023 यांसह विविध पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत. ET Now आणि Mid-Dayकडूनही तिचा सन्मान करण्यात आल्याची माहिती आहे.
चित्रपट, वेब सीरिज आणि म्युझिक व्हिडिओ
मॉडेलिंगसोबतच तानियाने अभिनय क्षेत्रातही काम केले आहे. चित्रपट आणि वेब सीरिजसोबतच तिने म्युझिक व्हिडिओमध्येही भूमिका साकारल्या आहेत. ‘गजवानी अँड चेस’ या चित्रपटात तिने CBI अधिकाऱ्याची भूमिका साकारल्याची माहिती आहे. त्यानंतर ती ‘चिडिया उड’ या वेब सीरिजमध्येही दिसली. या सीरिजमध्ये जॅकी श्रॉफ, सिकंदर खेर आणि भूमिका चावला यांच्याही भूमिका आहेत.
तानियाने आतापर्यंत सुमारे सात म्युझिक व्हिडिओंमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केल्याचे सांगितले जाते. ‘नखरो’ आणि ‘तू मेरा हो जाएगा’ यांसारख्या म्युझिक व्हिडिओंचा त्यात समावेश आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर तानियाचे फोटो व्हायरल होत असल्याने तिच्या आगामी कामाबाबतही उत्सुकता वाढली आहे. मात्र, तिच्या पुढील प्रोजेक्टची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसल्याची माहिती आहे.





