Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

‘CJP’च्या २ ऑक्टोबरच्या आंदोलनाला सोनम वांगचुक यांचा पाठिंबा; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी

नवी दिल्ली | केंद्रीय निवडणूक आयोगात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या एकतर्फी कार्यपद्धतीविरोधात इतर दोन आयुक्तांनी नोंदवलेल्या आक्षेपानंतर निर्माण झालेला वाद दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीने (CJP) २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी पुकारलेल्या देशव्यापी आंदोलनाला आता प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. “ज्ञानेश कुमार यांचा तात्काळ राजीनामा झालाच पाहिजे,” अशी ठाम मागणीही त्यांनी या वेळी केली.

‘पीटीआय’शी बोलताना सोनम वांगचुक म्हणाले, “देशात पारदर्शक कारभाराच्या दिशेने जे पाऊल उचलले जाईल, त्याला आमचा नेहमीच पाठिंबा असेल. निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा आत्मा आहे; जर ही मूलभूत प्रक्रियाच धोक्यात येणार असेल, तर लोकशाहीमध्ये काय शिल्लक राहणार? शिक्षण व्यवस्थेचा प्रश्न मांडण्यापासून आज निवडणूक सुधारणांपर्यंत सीजेपीचे कार्यकर्ते निष्ठेने लढा देत आहेत. देशाच्या हितासाठी होणाऱ्या अशा प्रत्येक आंदोलनात मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन. मी प्रत्यक्ष या आंदोलनात उपस्थित राहू शकत नसलो, तरी माझा पूर्ण पाठिंबा या आंदोलनाला आहे.”

हेही वाचा

भारत-अफगाणिस्तान एशियन गेम्स सामना पावसामुळे रद्द; टीम इंडिया उपांत्य फेरीत!

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी २ ऑक्टोबर रोजी आंदोलनाची हाक दिली आहे. जर आयुक्तांचा राजीनामा घेतला नाही, तर दिल्लीतील जंतरमंतर येथे याहून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिपके यांनी दिला आहे.

४ ऑक्टोबरला मुंबईत ठाकरे बंधूंचा महामोर्चा

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या कथित मनमानी कारभाराविरोधात महाराष्ट्रातही राजकीय वातावरण तापले असून, ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विराट महामोर्चा काढण्यात येणार आहे. या महामोर्चात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून करण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button