TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

Love And War: रणबीरनंतर आलिया भट्टचा फर्स्ट लुक रिलीज; कॅबरे स्टाइल अंदाजात अभिनेत्रीचा हटके अवतार

संजय लीला भन्साळींच्या बहुप्रतिक्षित सिनेमातील आलियाचा नवा लुक चर्चेत; रेट्रो ग्लॅमर आणि ओल्ड-स्कूल चार्मची झलक

मुंबई : संजय लीला भन्साळी यांच्या बहुप्रतिक्षित ‘लव्ह अँड वॉर’ या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. रणबीर कपूरचा फर्स्ट लुक समोर आल्यानंतर आता निर्मात्यांनी आलिया भट्टचा फर्स्ट लुक पोस्टर रिलीज केला आहे. आलियाचा हा लुक यापूर्वीच्या भूमिकांपेक्षा पूर्णपणे वेगळा असून, तिचा ग्लॅमरस आणि रेट्रो अंदाज लक्ष वेधून घेत आहे.

पोस्टरमध्ये आलिया भट्ट कॅबरे-स्टाइल लुकमध्ये दिसत आहे. एका खुर्चीवर बसलेली आलिया आकर्षक स्लिट स्कर्ट आणि हेडपीससह दिसते. पोस्टरच्या रिच बॅकग्राऊंडमधून रेट्रो काळाची झलक पाहायला मिळते. तिची स्टायलिश पोझ आणि आत्मविश्वासपूर्ण अंदाजामुळे हा लुक आणखी उठून दिसत आहे.

संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमांमध्ये भव्य सेट, प्रभावी व्यक्तिरेखा आणि प्रेमकथेचे अनोखे सादरीकरण पाहायला मिळते. **‘लव्ह अँड वॉर’**मधील आलियाचा हा लुकही त्याच भव्य सिनेमॅटिक दुनियेची झलक देणारा असल्याचे दिसून येते.

हेही वाचा –  राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; सरकारच्या निर्णयावर तुपकर, रोहित पवार, राजू शेट्टींची टीका

रणबीर कपूरच्या फर्स्ट लुकनंतर आलियाचा लुक समोर आल्याने सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. या सिनेमात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल प्रमुख भूमिकेत आहेत.

‘लव्ह अँड वॉर’ हा संजय लीला भन्साळी दिग्दर्शित सिनेमा असून तो २१ जानेवारी २०२७ रोजी प्रदर्शित होणार असल्याचे निर्मात्यांनी जाहीर केले आहे. हा चित्रपट हिंदीसोबत तमिळ आणि तेलुगू भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.

आलियाचा हा नवा अवतार समोर आल्यानंतर आता चित्रपटाची कथा, तिची व्यक्तिरेखा आणि रणबीर-विकी कौशलसोबतचे तिचे समीकरण कसे असेल, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button