TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘देवाभाऊंनी पुन्हा दाखवून दिलं, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी’ : मंत्री मेघना बोर्डीकर

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून परिस्थिती जाणून घेतली; पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

मुंबई : महाराष्ट्रातील एकूण ३५८ तालुक्यांपैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करत शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी आणि पीक परिस्थिती मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. त्यानंतर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेत दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयावर प्रतिक्रिया देताना मंत्री मेघना बोर्डीकर यांनी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे म्हटले. “देवाभाऊंनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की, सरकार शेतकरी बांधव-भगिनींच्या पाठीशी ठामपणे उभं आहे. अशा परिस्थितीत राजकारण न करता, प्रत्यक्ष गरजेच्या वेळी महायुतीचं सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढे आलं आहे,” अशी प्रतिक्रिया बोर्डीकर यांनी दिली.

हेही वाचा –  ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ठाकरे बंधूंचा ४ ऑक्टोबरला मुंबईत जनमोर्चा; SIR विरोधात सर्वपक्षीय एकजुटीचे आवाहन

पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश

दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पंचनामे अचूक आणि पारदर्शक पद्धतीने होणे महत्त्वाचे मानले जात आहे.

पंचनाम्यांमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी पिकांची प्रत्यक्ष स्थिती दर्शविणारे छायाचित्र तसेच जीपीएस लोकेशन संकलित करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष शेतातील नुकसानीची नोंद घेऊन त्याआधारे पुढील मदत आणि उपाययोजनांची प्रक्रिया राबवली जाणार आहे.

दुष्काळ जाहीर झाल्यानंतर आता शासनाच्या मदतीच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button