Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

कुणकेश्वरमध्ये ‘ट्री ऑफ लाइफ’चे आलिशान ताज हॉटेल; सिंधुदुर्गच्या पर्यटनाला नवी झळाळी

५० खोल्यांचा प्रकल्प २४ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन; रोजगार आणि स्थानिक व्यवसायांच्या संधी वाढणार

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात ‘कोकणची काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुणकेश्वर येथे ताज हॉटेल्सच्या ‘ट्री ऑफ लाइफ’ ब्रँडचे आलिशान हॉटेल उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासंदर्भातील करार मंत्रालयात मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत झाला. ५० खोल्यांचे हे हॉटेल अवघ्या २४ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

शिरोडा-वेळागरनंतर आता कुणकेश्वर येथेही ताज हॉटेल साकारत असल्याने देवगडसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होण्याबरोबरच विविध व्यवसायांना चालना मिळणार आहे. पर्यटनवाढीमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला आणि जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नाला हातभार लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा –रस्ता अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवा; प्रताप सरनाईक यांचे निर्देश

कोकणच्या निसर्गसौंदर्याला जागतिक दर्जाच्या पर्यटन सुविधांची जोड देऊन सिंधुदुर्गला देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या प्रयत्नांना या प्रकल्पामुळे बळ मिळणार आहे. कुणकेश्वरच्या धार्मिक आणि पर्यटन महत्त्वासोबतच आधुनिक आदरातिथ्य सुविधा उपलब्ध होणार असल्याने या परिसराच्या पर्यटन क्षमतेत भर पडणार आहे.

कुणकेश्वर परिसरातील पर्यटन विकासाला गती देताना स्थानिक रोजगार, व्यवसाय आणि पायाभूत सुविधांच्या विकासालाही महत्त्व मिळणार आहे. त्यामुळे हा हॉटेल प्रकल्प देवगड आणि सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासातील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, ताज ग्रुपचे तन्वीर जाहीदी, दत्तात्रय हिरे आणि रोहन रानडे उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button