तरुणांसाठी इस्रोची मोठी संधी; AI आणि Machine Learning वर मोफत ऑनलाइन प्रशिक्षण
‘Hydro-Informatics’मध्ये AI आणि Machine Learningचा वापर शिकता येणार; ४ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी, ५ ते १० ऑक्टोबरदरम्यान प्रशिक्षण

देहराडून : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)च्या संलग्न संस्थेच्या वतीने तरुणांसाठी ‘AI आणि Machine Learning for Hydro-Informatics’ या विषयावर मोफत ऑनलाइन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. जलसंपत्ती व्यवस्थापन आणि हायड्रो-इन्फॉर्मेटिक्सशी संबंधित क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मशीन लर्निंगचा वापर कसा करता येतो, याबाबत या प्रशिक्षणातून मार्गदर्शन केले जाणार आहे.
या प्रशिक्षणाच्या माध्यमातून सहभागी विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. प्रशिक्षणात जलसंपत्तीशी संबंधित विविध प्रयोग आणि अभ्यासामध्ये AI व Machine Learningचा उपयोग याबाबत माहिती दिली जाणार आहे.
LMS वर नियमित सहभाग आवश्यक
प्रशिक्षणादरम्यान सहभागी उमेदवारांना ISRO LMS वर उपलब्ध असलेल्या दैनिक प्रश्नमंजुषेत सहभागी होणे बंधनकारक आहे. प्रत्येक सहभागीच्या अभ्यासक्रमातील सहभागाची नोंद LMS प्रणालीद्वारे ठेवली जाणार आहे. यामध्ये व्हिडीओ पाहण्यासाठी दिलेला वेळ, दैनिक प्रश्नमंजुषेतील सहभाग तसेच अभ्यासक्रमाशी संबंधित अभिप्राय यांचा समावेश असेल.
संपूर्ण प्रशिक्षण कालावधीत सहभागी उमेदवारांना LMS वरील टास्क नियमितपणे पूर्ण करावे लागतील. क्विझ आणि फीडबॅक यांसारख्या उपक्रमांचाही प्रशिक्षणातील सहभाग नोंदवण्यासाठी वापर केला जाणार आहे.
हेही वाचा – परदेशात जाण्याची गरज कमी होणार; महाराष्ट्रात सात आंतरराष्ट्रीय विद्यापीठे, फडणवीस यांची माहिती
सहभागाचे प्रमाणपत्र मिळणार
निर्धारित वेळेत आवश्यक टास्क पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना ‘Course Participation’ प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. हे प्रमाणपत्र ISRO e-Class LMS वरून थेट डाउनलोड करता येणार आहे.
हा प्रशिक्षण कार्यक्रम थेट आणि संवादात्मक ऑनलाइन सत्रांच्या स्वरूपात आयोजित केला जाणार असून, थेट सत्रांसोबत रेकॉर्ड केलेले व्हिडीओही उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
४ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी
या प्रशिक्षणासाठी उमेदवारांना ४ ऑक्टोबर २०२६पर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी ५ ते १० ऑक्टोबर २०२६ असा आहे. वैयक्तिक सहभागींना स्वतंत्र मंजुरीची आवश्यकता नसून, नोंदणी केल्यानंतर त्यांना LMS लॉगिनची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे.





