Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

इस्लाममध्ये मूर्तीपूजा अमान्य, मग ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है?’; गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशबंदीवर धीरेंद्र शास्त्रींचे वक्तव्य

Dhirendra Shastri | नवरात्रोत्सवातील गरबा आणि दांडिया आयोजनात बिगरहिंदूंना, विशेषतः मुस्लिमांना प्रवेश नाकारण्याच्या मुद्द्यावरून सध्या देशभरात वाद पेटला आहे. विश्व हिंदू परिषदेने (VHP) घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर आता बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनीही या प्रवेशबंदीचे थेट समर्थन केले आहे. नवरात्र उत्सव ही सनातनी परंपरा असून ती मूर्तीपूजा आहे. इस्लाम धर्मात मूर्तीपूजा अमान्य असताना ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम?’ असा खोचक सवाल धीरेंद्र शास्त्री यांनी उपस्थित केला.

मुंबई आणि भिवंडी येथील गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री पत्रकारांशी बोलत होते. गरब्यातील प्रवेशबंदीबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, “प्रत्येकाने आपापले सण साजरे केले पाहिजेत. नवरात्रीमध्ये दुर्गापूजा आणि गरबा हा निव्वळ सण नसून ती देवीची मूर्तीपूजा आणि आराधना आहे. इस्लाममध्ये जर मूर्तीपूजा मानली जात नाही, तर अशा पूजेच्या ठिकाणी त्यांनी कशासाठी यावे?” असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.

हेही वाचा

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

आपल्या दौऱ्याविषयी बोलताना शास्त्री म्हणाले, “मुंबई ही मायानगरी आणि सिद्धिविनायकाची पावन भूमी आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्र गजाननमय झाला आहे. भिवंडीत बागेश्वर धामचा मठ असल्याने मी येथे येत असतो.” भारताला विश्वगुरू बनवण्याविषयी भूमिका मांडताना ते म्हणाले की, “भारतातील लोकांना केवळ अनुयायी न ठेवता गुरू बनवायचे आहे. येथील प्रत्येक नागरिक जेव्हा गुरूच्या भूमिकेत येईल, तेव्हाच भारत खऱ्या अर्थाने विश्वगुरू बनेल.”

विश्व हिंदू परिषदेचे नेमके आवाहन काय?

गरब्यातील प्रवेशावरून विहिंपने आधीच कडक नियमावली जाहीर केली आहे. विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते व सहसचिव श्रीराज नायर यांनी स्पष्ट केले की, “नवरात्रोत्सवातील गरबा व दांडिया कार्यक्रमात मुस्लिमांना प्रवेश देऊ नये, असा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच गरब्याला येणाऱ्या हिंदूंना कपाळावर टिळा लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नवरात्र हा देवीच्या भक्तीचा सण आहे. त्यामुळे मुळातच मूर्तीपूजेला विरोध असणाऱ्या घटकांनी या धार्मिक उत्सवात सहभागी होण्याचे काहीच कारण नाही.”

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button