ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

नूतन अभियांत्रिकीमध्ये ड्रोन आणि एआय तंत्रज्ञान बूटकॅम्पचे यशस्वी आयोजन

पिंपरी | पिंपरी चिंचवड एज्यकेशन ट्रस्ट आणि नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचालित नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी तळेगाव मध्ये सी-डॅक पुणे यांच्या सहकार्याने ड्रोन आणि एआय तंत्रज्ञान या विषयावरील पाच दिवसीय बूट कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते . या बूटकॅम्पमध्ये ३५० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना ड्रोन तंत्रज्ञानाच्या निर्मितीपासून त्याच्या विविध प्रत्यक्ष उपयोगांपर्यंतचे प्रशिक्षण तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून देण्यात येणार आले. बूटकॅम्पमध्ये ड्रोन असेंब्ली, फ्लाइट डायनॅमिक्स, एआय आधारित कॉम्प्युटर व्हिजन, ऑब्जेक्ट डिटेक्शन, इमेज प्रोसेसिंग,आयओटी तसेच इंटेलिजंट डिसिजन मेकिंग यांसारख्या विषयांचा समावेश आहे.

उद्घाटन प्रसंगी अभियांत्रिकीचे संचालक डॉ. प्रमोद पाटील, सी-डॅक पुणेचे सहव्यवस्थापक कौशल शर्मा, आदित्य खापरे, संशोधन विकास विभागाचे अधिष्ठाता डॉ. विलास देवतारे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. सागर शिंदे, संगणक विभागाचे विभाग प्रमुख डॉ. राहुल पाटील, बूटकॅम्पचे समन्वयक प्रा. प्रितम आहिरे, प्रा. अतुल मायराळे व प्रा. स्पंदन वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकामध्ये डॉ. राहुल पाटील यांनी आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात बहुविद्याशाखीय शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. ड्रोन तंत्रज्ञान हे केवळ एखाद्या एका शाखेपुरते मर्यादित नसून संगणक अभियांत्रिकी, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन, आयओटी आणि ऑटोमेशन अशा विविध क्षेत्रांचा संगम असल्याचे त्यांनी सांगितले.

अभियांत्रिकीचे संचालक डॉ. प्रमोद पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना कौशल्याधारित, अनुभवाधारित आणि बहुविद्याशाखीय शिक्षण देण्याची गरज व्यक्त केली. ड्रोन व एआय तंत्रज्ञानाच्या वाढत्या व्याप्तीवर प्रकाश टाकला.

हेही वाचा

मराठवाड्यातील दुष्काळमुक्तीसाठी कृष्णाखोरे, कोकणातील पाणी आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सी-डॅक पुणेचे सहव्यवस्थापक कौशल शर्मा यांनी सी-डॅकच्या वाटचालीची व विविध तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच सी-डॅक मधील करिअरच्या विविध संधी, अत्याधुनिक तंत्रज्ञानातील कामाचे स्वरूप आणि विद्यार्थ्यांनी भविष्यातील करिअरसाठी आवश्यक कौशल्ये कशी विकसित करावीत याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

या बूटकॅम्प दरम्यान सी-डॅक चे तज्ज्ञ प्रशिक्षक विद्यार्थ्यांना ड्रोन तयार करणे, असेंब्ली, ड्रोनचे उड्डाण, यूएएस तंत्रज्ञान तसेच एआय आधारित विविध अनुप्रयोगांचे प्रात्यक्षिक व प्रत्यक्ष प्रशिक्षण देणार आले .विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानासाठी सज्ज करणारा आणि ड्रोन, एआय सारख्या स्वायत्त प्रणालींच्या क्षेत्रातील नव्या संधींची दारे खुली करणारा हा बूटकॅम्प विद्यार्थ्यांच्या तंत्रज्ञानाधारित शिक्षणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष संजय (बाळा) भेगडे, उपाध्यक्ष नंदकुमार शेलार, सचिव संतोष खांडगे खजिनदार तसेच अभियांत्रिकीच्या कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश म्हस्के, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांचे मार्गदर्शन, प्रोत्साहन व सातत्यपूर्ण सहकार्य लाभत आहे. . त्यांच्या दूरदृष्टी आणि तंत्रज्ञानाभिमुख शैक्षणिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या भूमिकेमुळे विद्यार्थ्यांसाठी अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांना चालना मिळत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button