ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दापोडी परिसरामध्ये नाले सफाई मोहीम

नगरसेविका स्वाती माई काटे यांचा पुढाकार

– कचरा, गाळ काढून औषध फवारणीला गती

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

दापोडीतील प्रभाग क्रमांक ३० मधील रेल्वे लाईनजवळील सिद्धार्थनगर परिसरातील मोठ्या नाल्यात मोठ्या प्रमाणात साचलेली घाण, कचरा आणि गाळ यामुळे परिसरात दुर्गंधी तसेच अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर स्थानिक नगरसेविका स्वाती माई काटे यांच्या पुढाकाराने नाल्याची व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

नाल्यातील कचरा, गाळ काढण्याची मोहीम

सिद्धार्थनगर परिसरातील या नाल्यात अनेक दिवसांपासून कचरा व घाण साचल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. पावसाळ्यात नाल्यातील पाण्याचा प्रवाह सुरळीत राहण्यासाठी तसेच परिसरात साचण्याची शक्यता कमी करण्यासाठी नाल्यातील कचरा, घाण आणि गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले. नगरसेविका स्वाती माई काटे यांच्या पुढाकारातून संबंधित कर्मचाऱ्यांनी नाल्यात उतरून साचलेला कचरा बाहेर काढला. त्यानंतर परिसराची साफसफाई करून औषध फवारणी करण्यात आली, त्यामुळे नाल्याची स्वच्छता होण्याबरोबरच डासांचा प्रादुर्भाव आणि दुर्गंधी कमी होण्यास मदत होणार आहे.

नागरिकांकडून समाधान व्यक्त

सिद्धार्थनगरमधील नागरिकांच्या दैनंदिन आरोग्याशी संबंधित समस्या लक्षात घेऊन ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. परिसरातील नाले, गटारे आणि सार्वजनिक ठिकाणांची नियमित स्वच्छता करण्याची मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.

नगरसेविकांची प्रतिक्रिया

“नागरिकांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण मिळणे ही प्राथमिक जबाबदारी आहे. प्रभागातील स्वच्छतेशी संबंधित समस्या निदर्शनास येताच त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जात आहे,” अशी भूमिका नगरसेविका सौ. स्वाती माई काटे यांनी व्यक्त केली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button