Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

पुण्यातील मानाच्या गणपतींचे मुख्यमंत्री फडणवीसांकडून दर्शन; ढोल वाजवून गणेशोत्सवाचा घेतला आनंद

कसबा गणपती, दगडूशेठ हलवाई गणपतीसह विविध मंडळांना भेट; गणेश मंडळांच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देत श्री गणरायाचे दर्शन घेतले आणि आरती केली. यावेळी विविध गणेश मंडळांच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मानाचा कसबा गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, साने गुरुजी तरुण मंडळ तसेच श्रीसाई मित्रमंडळ ट्रस्ट येथील गणरायाचे दर्शन घेत आरती केली. तसेच महापौर मंजुषा नागपुरे आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निवासस्थानी भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले.

यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार नितीन नबीन, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार रवींद्र चव्हाण, योगेश टिळेकर, हेमंत रासणे यांच्यासह विविध गणेश मंडळांचे विश्वस्त आणि पदाधिकारी उपस्थित होते. कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचे अध्यक्ष सुनील रासणे आणि साने गुरुजी तरुण मंडळाचे अध्यक्ष धीरज घाटे यांचीही उपस्थिती होती.

हेही वाचा –  सेवा संकल्प अभियाना’तून राज्यभर सर्वसमावेशक आरोग्य तपासणी; ॲनिमिया निर्मूलनावर विशेष भर

ढोल वाजविण्याचा घेतला आनंद

श्रीसाई मित्रमंडळ ट्रस्टच्या गणपती परिसरात मुख्यमंत्री फडणवीस यांचे पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी ढोल वाजविणाऱ्या युवकाकडून टिपरू काठी घेत स्वतः ढोल वाजवून गणेशोत्सवाचा आनंद घेतला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ढोल वाजवताच उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button