ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळात श्री गणरायाची विधिवत प्राणप्रतिष्ठा; विलास लांडे यांच्या हस्ते आरती संपन्न

पिंपरी चिंचवड (विशेष प्रतिनिधी)

राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या भोसरी आणि डुडुळगाव येथील दोन्ही शैक्षणिक संकुलांमध्ये श्री गणेश चतुर्थीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार श्री. विलास लांडे यांच्या शुभहस्ते श्री गणेशाची विधिवत प्राणप्रतिष्ठा व आरती करण्यात आली.

​या मंगलप्रसंगी बोलताना श्री. विलास लांडे यांनी उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांना गणेशोत्सवाच्या आणि गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. “गणपती बाप्पा ही बुद्धी आणि मंगलतेची देवता आहे. बाप्पाच्या आशीर्वादाने सर्व विद्यार्थ्यांना उत्तम आरोग्य, उज्वल भविष्य आणि यशाची प्राप्ती होवो,” अशी प्रार्थना त्यांनी या वेळी केली. तसेच संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे योगदान कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा –  गणरायाच्या आगमनासोबत राज्यात पुन्हा पावसाचा जोर; १४-१५ सप्टेंबरला मुसळधार पावसाचा अंदाज

​भोसरी व डुडुळगाव येथील दोन्ही संकुलांत सकाळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात श्रींची मूर्ती स्थापन करण्यात आली. संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणाने आणि आकर्षक सजावटीने उजळून निघाला होता. ​या सोहळ्यास संस्थेचे पदाधिकारी, विविध विभागांचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरतीनंतर सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

​”गणपती बाप्पा ही बुद्धी, ज्ञान आणि मंगलतेची देवता आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या भोसरी आणि डुडुळगाव दोन्ही संकुलांत बाप्पाचे आगमन अत्यंत उत्साहात व भक्तीमय वातावरणात झाले आहे. श्री गणरायाच्या कृपेने आपल्या संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना उत्तम आरोग्य, उज्वल भविष्य आणि यशाची शिखरे गाठण्याची शक्ती मिळो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना.​शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना उत्तम सुविधा देण्यासाठी आमची संस्था सदैव कटिबद्ध आहे. संस्थेच्या या यशस्वी प्रवासात सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे राहिले आहे. या पवित्र गणेशोत्सवाच्या निमित्ताने मी जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या संपूर्ण परिवाराला आणि सर्व नागरिकांना गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो.”

– ​श्री. विलास लांडे
(संस्थापक अध्यक्ष – राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ , तथा प्रथम आमदार – भोसरी विधानसभा)

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button