TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सराव शिबिरांत  गोविंदा पथकांची रंगीत तालीम; १९ पथकांनी रचले नऊ थर

मुंबई, ठाणे आणि अलिबागमधील गोविंदा पथकांचा सराव शिबिरात सहभाग; दोन महिला पथकांनी सात थरांची हंडी लावली

मुंबई : नारळी पौर्णिमेनिमित्त मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये विविध ठिकाणी गोविंदा पथकांसाठी सराव शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या सराव शिबिरांमध्ये मुंबई, ठाणे, अलिबागसह अन्य भागांतील गोविंदा पथकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी १९ गोविंदा पथकांनी नऊ थर लावण्यापर्यंत मजल मारली, तर दोन महिला गोविंदा पथकांनी सात थरांची हंडी लावली.

सराव शिबिरांमध्ये होणारी दहीहंडी पाहण्यासाठी मुंबईकरही मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. दहीहंडी उत्सवात आयोजकांकडून मोठ्या रकमेची पारितोषिके दिली जात असल्याने गोविंदा पथकांसाठी या सराव शिबिरांना विशेष महत्त्व असते. नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित या शिबिरांमधून पथके आगामी दहीहंडी उत्सवासाठी आपल्या क्षमतेची आणि थरांची रंगीत तालीम करून घेतात.

हेही वाचा –  लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट हप्ता कधी मिळणार? ३ हजार रुपयांबाबत मोठी अपडेट

या सराव शिबिरात माझगाव-ताडवाडी, जय जवान-जोगेश्वरी, शिवसाई-बोरिवली, कोकण नगर-जोगेश्वरी, आर्यन्स-जोगेश्वरी, खोपट-ठाणे, अष्टविनायक-वडाळा, यश-वडाळा, मालपा डोंगरी-अंधेरी, ठाण्याचा राजा, कांजूरमार्गचा महाराजा, सीपी तलाव-ठाणे, विघ्नहर्ता-सांताक्रुझ, जरीमरी-गिरगाव, रामनगरचा राजा-ठाणे, कांजूरमार्गचा राजा, शिवनेरी-भांडुप, ओमकार-गिरगाव आणि अलिबाग मेटपाडा या १९ गोविंदा पथकांनी नऊ थर रचले.

महिला गोविंदा पथकांनीही या सराव शिबिरांमध्ये उत्साहाने सहभाग घेत थर रचण्याचे कौशल्य दाखवले. यामध्ये पार्लेतील स्पोर्ट्स आणि ठाण्यातील शिवतेज या महिला गोविंदा पथकांनी सात थरांची हंडी लावली.

नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने झालेल्या या सराव शिबिरांमुळे आगामी दहीहंडी उत्सवासाठी गोविंदा पथकांचा उत्साह वाढला असून, यंदाच्या उत्सवात थरांच्या विक्रमांसह रंगतदार स्पर्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button