ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

काळभोर नगरातील ५३ महिला बनल्या उद्योजकतेच्या दिशेने सक्षम!

२६ दिवसीय मिलेट्स, कुकीज, केक व मसाला प्रक्रिया प्रशिक्षणाचा प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात

पुणे : महिलांना कौशल्याधारित प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी बनवून त्यांना उद्योजकतेच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने काळभोर नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या २६ दिवसीय सूक्ष्म कौशल्य उद्यमिता विकास कार्यक्रमाचा प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. या प्रशिक्षणाचा लाभ ५३ महिलांनी घेतला.

नगरसेविका वैशालीताई काळभोर, नगरसेवक प्रमोद कुटे , नगरसेविका अरुणाताई लंगोटे, युवा नेते विशाल काळभोर यांच्या व भारतीय उद्यमिता विकास संस्थान (EDII), अ‍ॅक्सेंचर आणि WE-Act यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), पुणे आणि दीपस्तंभ लोकसंचालित साधन केंद्र, भोर यांच्या सहकार्याने “मिलेट्स प्रॉडक्ट्स – कुकीज, केक व मसाला प्रक्रिया” या विषयावर हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

हेही वाचा – एआय इनोव्हेशन क्लब”चे थाटात उद्घाटन; तज्ज्ञ मार्गदर्शन आणि एआय व्हिडिओ मेकिंग स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रमाणपत्र वितरण समारंभाला विशाल काळभोर, अनुराधाताई काळभोर, माविम पुणेच्या अध्यक्ष श्वेता देवकर, उपाध्यक्ष सारिका जावळे, बाळासाहेब मुळे, सीएमआरसी भोसरीचे व्यवस्थापक निलेश साबळे, माविमच्या लेखापाल स्नेहल ठुबल, आकुर्डीच्या एरिया को-ऑर्डिनेटर ज्योती मुकेश हेळवे, भोसरीच्या एरिया को-ऑर्डिनेटर पल्लवी गुळवे, ट्रेनर अमृता गोडसे, सहयोगिनी मनीषा शिर्के, तसेच EDII चे प्रोजेक्ट ऑफिसर भगवान हरकळ आणि मिशन स्वावलंबन लोकसंचालित साधन केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.

EDII, अ‍ॅक्सेंचर, WE-Act आणि माविम यांच्या माध्यमातून महिला उद्योजिकांना प्रशिक्षण, मार्गदर्शन, उद्योग उभारणीसाठी सहाय्य, बाजारपेठेशी जोडणी आणि शाश्वत व्यवसायासाठी आवश्यक परिसंस्था उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण टप्पा ठरला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button