TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मनोज जरांगे पाटील यांच्या शुगर रिपोर्टवर सवाल; “पत्रकारांनी सोक्षमोक्ष लावावा”

उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी वैद्यकीय तपासणी; शुगर ९४ वरून ६६, नंतर ८० वर गेल्याने जरांगेंनी उपस्थित केला प्रश्न

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. उपोषणादरम्यान वैद्यकीय पथकाकडून त्यांच्या प्रकृतीची नियमित तपासणी केली जात आहे. मात्र, वैद्यकीय तपासणीत समोर आलेल्या रक्तातील साखरेच्या पातळीच्या आकडेवारीवरच जरांगे पाटील यांनी शंका उपस्थित केली आहे. या प्रकरणाचा पत्रकारांनी सोक्षमोक्ष लावावा, अशी मागणी त्यांनी केली.

रविवारी संध्याकाळी वैद्यकीय पथकाने जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची तपासणी केली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. मात्र, त्यांच्या शरीरातील साखरेची पातळी कमी होत असल्याचेही समोर आले होते. त्यानंतर शुगरच्या पातळीत चढ-उतार होत असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा –  आधुनिक महाविद्यालयीन ग्रंथालये: डिजिटल युगातील ज्ञान, संशोधन आणि शैक्षणिक परिवर्तनाचे केंद्र

शुगर अचानक वाढायला कशी लागली?”

याबाबत प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, पहिल्या दिवशी माझी शुगर ९४ होती. दुसऱ्या दिवशी ती ६६ असल्याचे सांगण्यात आले. ९४ वरून थेट ६६ वर शुगर आली. त्यानंतर ती ७२ आणि आता ८० झाली आहे. शुगर अचानक वाढायला कशी लागली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मी काही खात असल्याचा संशय असेल तर येथे मशीन आणून तपासणी करा, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले. “माझ्या पोटात अन्नाचा एक कण आणि पाण्याचा एक थेंब गेला असेल, तर तुम्ही म्हणाल तिथे जीव द्यायला मी तयार आहे,” असे ते म्हणाले.

या संपूर्ण प्रकरणाची गंभीरपणे दखल घेण्याची गरज असून पत्रकारांनी याचा सोक्षमोक्ष लावावा, असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केले. उपोषणाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकाकडून लक्ष ठेवले जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button