विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून कौशल्य विकासावर भर : नूतन महाराष्ट्र इंजिनिअरिंग कॉलेजचा (NMIET) संकल्प

पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी):
विद्यार्थ्यांना केवळ पारंपरिक पदवी न देता उद्योग क्षेत्राच्या गरजेनुसार कौशल्यविकास आणि प्रात्यक्षिक शिक्षण देण्यावर नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचा (NMIET) मुख्य भर राहणार आहे, अशी माहिती संस्थेच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष राजेश म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत बोलताना राजेश म्हस्के म्हणाले, “आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात केवळ पदवी पुरेशी नसून उद्योगांच्या गरजेनुसार कौशल्य प्राप्त करणे ही काळाची गरज बनली आहे. शिक्षण, तंत्रज्ञान, उद्योग आणि उद्योजकता यांचा एकत्रित विकास झाल्यास भविष्यातील सक्षम मनुष्यबळ निर्माण होईल. नूतन इनक्युबेशन सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थी, ग्रामीण युवक, औद्योगिक कर्मचारी व नवउद्योजकांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे.”
हेही वाचा – मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांची ठाम भूमिका; सरकारसोबत चर्चेतून तोडगा काढण्याची अपेक्षा
संस्थेचे संचालक डॉ. प्रमोद पाटील यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमाचा विस्तार, संशोधन, नवोपक्रम, पेटंट, कॉपीराइट, आंतरराष्ट्रीय परिषदा आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी भागीदारी या संकल्पनांवर प्रकाश टाकला. उद्योगांशी सहकार्य वाढवून संस्थेला जागतिक स्तरावर नेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी सीईओ डॉ. रामचंद्र जहागीरदार, प्रवेश प्रक्रिया व आऊटरिच प्रमुख डॉ. मिलिंद ओव्हाळ आणि प्रसिद्धी प्रमुख प्रीती धुले उपस्थित होते. डॉ. मिलिंद ओव्हाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
”आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात केवळ पारंपारिक पदवी मिळवणे पुरेशी नसून उद्योगांच्या गरजेनुसार कौशल्य प्राप्त करणे ही काळाची गरज बनली आहे. NMIET मध्ये आमचा मुख्य भर हा विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांना व्यावहारिक आणि उद्योगाभिमुख शिक्षण देण्यावर आहे. आमच्या ‘नूतन इनक्युबेशन सेंटर’च्या माध्यमातून नवोन्मेष, संशोधन आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन जागतिक दर्जाचे सक्षम मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
— राजेश म्हस्के (अध्यक्ष, कार्यकारी समिती / NMIET)





