Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

बालकांना संविधानिक हक्कांची ओळख करून देणारे ‘18 मूलभूत हक्क’ कलरिंग बुक

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण; संविधान फेलोशिपचाही शुभारंभ

मुंबई : बालकांना त्यांच्या संविधानिक हक्कांची माहिती लहान वयातच सहज आणि आनंददायी पद्धतीने मिळावी, या उद्देशाने न्याय संस्था आणि सेंटर फॉर लीगल पॉलिसी यांच्या वतीने ‘प्रत्येक बालकाने जाणून घ्यावेत असे 18 मूलभूत हक्क’ हे कलरिंग बुक तयार करण्यात आले आहे. या पुस्तकाचे लोकार्पण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) येथे आयोजित कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डंगरे, माजी न्यायमूर्ती आर. सी. चव्हाण, अनिशा गोपी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या वतीने राज्यात संविधान फेलोशिपचाही शुभारंभ करण्यात आला.

18 महत्त्वपूर्ण हक्कांची माहिती

बालकांना त्यांच्या हक्कांची जाणीव लहान वयापासूनच व्हावी, या उद्देशाने तयार करण्यात आलेले हे कलरिंग बुक मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. निवारा, पोषण, शिक्षण आणि मोफत कायदेशीर मदत यांसह बालकांच्या 18 महत्त्वपूर्ण हक्कांची माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.

बालविवाह, बालमजुरी, रॅगिंग, बुलिंग आणि लैंगिक शोषण यांसारख्या संवेदनशील विषयांचाही बालकांना समजेल अशा सोप्या पद्धतीने पुस्तकात समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा –  शाळा-महाविद्यालयांत योग शिक्षकांची स्वतंत्र पदे निर्माण करा; राज्यपाल जिष्णु देव वर्मा

कलरिंग बुक’मधून हक्कांची जाणीव रुजणार : आदिती तटकरे

बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी शासन सदैव कटिबद्ध आहे. कल्पकतेच्या माध्यमातून या प्रयत्नांना बळ देणाऱ्या कलरिंग बुकमुळे बालकांना त्यांच्या हक्कांची माहिती सहज आणि आनंददायी पद्धतीने मिळणार आहे. रंग भरताना त्यांच्या मनावर हक्कांची जाणीव रुजण्यास मदत होईल, असे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

संविधान फेलोशिपच्या माध्यमातून कायदे आणि संविधानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी संस्थेने घेतलेला पुढाकारही महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमादरम्यान धारावी ड्रीम प्रोजेक्टच्या वतीने सादरीकरण करण्यात आले. तसेच बालकांच्या हक्कांवर आधारित रॅप गीताचेही लोकार्पण करण्यात आले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button