TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

‘मराठी ब्युटी’चा जलवा! ‘मांजर’मधील भन्नाट पार्टी साँग प्रेक्षकांच्या भेटीला

सिद्धार्थ मेनन आणि वैष्णवी आंधळेंचा एनर्जेटिक डान्स; रोहन-रोहन यांच्या संगीताने गाण्यात भरली धमाल

मुंबई : चार मित्रांच्या धमाल विश्वाची झलक दाखवणाऱ्या ‘मांजर’ या चित्रपटातील ‘मराठी ब्युटी’ हे भन्नाट पार्टी साँग नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. जोशपूर्ण बीट्स, एनर्जेटिक डान्स आणि मस्तीने भरलेल्या अंदाजामुळे हे गाणे सध्या चांगलेच लक्ष वेधून घेत आहे. पार्टीचा माहोल, भन्नाट एनर्जी आणि बिनधास्त अंदाज यामुळे ‘मराठी ब्युटी’ संगीतप्रेमींना ठेका धरायला लावणारे ठरणार आहे.

सिद्धार्थ-वैष्णवीची जबरदस्त केमिस्ट्री

‘मराठी ब्युटी’ हे गाणे सिद्धार्थ मेनन आणि वैष्णवी आंधळे यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. गाण्यातील कलाकारांची जबरदस्त एनर्जी आणि त्यांच्या डान्समधून दिसणारी धमाल यामुळे गाण्याची रंगत आणखी वाढली आहे. एका मराठी मुलीच्या सौंदर्याचे आणि व्यक्तिमत्त्वाचे कौतुक करताना सिद्धार्थ मेननची व्यक्तिरेखा दिसते. त्याभोवती रंगणारा पार्टीचा माहोल आणि कलाकारांचे बिनधास्त सादरीकरण गाण्याला वेगळीच मजा देत आहे.

रोहन-रोहन यांचे संगीत, रोहन प्रधानचा दमदार आवाज

‘मराठी ब्युटी’ या गाण्याला रोहन-रोहन यांनी संगीतबद्ध केले आहे. रोहन प्रधान यांनी आपल्या दमदार आवाजात हे गाणे गायले असून प्रशांत मडपुवार यांनी गाण्याचे शब्द लिहिले आहेत. जोशपूर्ण संगीत, भन्नाट शब्द आणि कलाकारांच्या एनर्जेटिक सादरीकरणाचा सुरेख मेळ या गाण्यात पाहायला मिळतो. त्यामुळे तरुणाईच्या प्लेलिस्टमध्ये हे गाणे स्थान मिळवणार का, याची उत्सुकता आहे.

हेही वाचा –  लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्षाबंधनाची ओवाळणी! 1 कोटी 64 लाख महिलांना 2,437 कोटींचा हप्ता जमा

गाणं प्रेक्षकांना ठेका धरायला भाग पाडेल

गाण्याबद्दल दिग्दर्शक सुशील महादेव म्हणतात, “आजच्या तरुणाईला पार्टी, मस्ती आणि एन्जॉयमेंटचा मूड खूप आवडतो. ‘मराठी ब्युटी’ हे गाणं त्याच धमाल वातावरणातून साकारलं आहे. गाण्यात सिद्धार्थ मेननची व्यक्तिरेखा एका मराठी मुलीच्या सौंदर्याचं कौतुक करताना दिसते. तिचं सौंदर्य, गाण्याचा एनर्जेटिक अंदाज आणि त्याला मिळालेली धमाकेदार संगीताची साथ यामुळे ‘मराठी ब्युटी’ला एक वेगळीच रंगत आली आहे. हे गाणं प्रेक्षकांना नक्कीच एन्जॉय करायला लावेल आणि त्यांना ठेका धरायला भाग पाडेल.”

मांजर१८ सप्टेंबरला सिनेमागृहात

एचथ्रीओ मोशन पिक्चर्स आणि जस्ट राईट फिल्म्स निर्मित ‘मांजर’चे दिग्दर्शन सुशील महादेव यांनी केले आहे. चित्रपटात सिद्धार्थ मेनन, ओंकार भोजने, तेजस राऊत आणि भाग्यश्री लिमये यांच्यासह सयाजी शिंदे, अंशुमन विचारे, वैष्णवी आंधळे आणि अश्विनी काळसेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

हर्ष, अविनाश शर्मा, हरि राजपूत, बंटी नागी आणि जसबीर नागी यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून, वितरणाची धुरा एए फिल्म्स यांनी सांभाळली आहे. ‘मांजर’ हा चित्रपट १८ सप्टेंबर २०२६ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button