ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्वदेशा हाऊसिंग सोसायटीत स्वच्छतेसाठी श्रमदानाचा आदर्श

‘आपली सोसायटी,आपली स्वच्छता’ उपक्रमाला रहिवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महिन्यातील दोन रविवार दोन तास श्रमदानाचा संकल्प

पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी –

स्वदेशा हाऊसिंग सोसायटी परिसर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी सोसायटीच्या वतीने ‘आपली सोसायटी, आपली स्वच्छता’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत महिन्यातील दोन रविवार प्रत्येकी दोन तास सोसायटीच्या स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. रहिवाशांनी स्वतः पुढाकार घेत या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला.

या श्रमदान मोहिमेदरम्यान सोसायटी परिसरातील वाढलेले गवत,दगड,कचरा तसेच इतर अनावश्यक वस्तू हटविण्यात आल्या.तसेच परिसरातील उद्यान आणि खेळाच्या जागेची स्वच्छता करण्यात आली. त्यामुळे या जागांचा रहिवाशांना अधिक चांगल्या पद्धतीने वापर करता यावा, यासाठीही प्रयत्न करण्यात आले.

केवळ स्वच्छता कर्मचाऱ्यांवर अवलंबून न राहता ‘आपली सोसायटी ही आपलीच जबाबदारी’ या भावनेतून रहिवाशांनी स्वतः श्रमदान करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वच्छतेसोबतच पर्यावरण संवर्धन, नागरिकांमध्ये सामाजिक सहभाग आणि एकोपा वाढविणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

हेही वाचा –  पुणे-पिंपरी-चिंचवड शहरांच्या विकासात खान्देशी लोकांचा मोठा हातभार : वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे

या उपक्रमाची संकल्पना उपाध्यक्ष, सोसायटी फेडरेशन तथा चेअरमन, स्वदेशा हाऊसिंग सोसायटी यांची असून,प्रवीण सिंग यांच्या पुढाकारानेही मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. तेजस खांडगे, सिराज शेख, संदीप डोलतोडे, श्रीकांत बडे, आदित्य बोधे, स्वराज किल्लेदार, सुधीर महाले, अभिषेक भोसले, गिरीजेश यादव, बाबाजी फापाळे, सचिन उपाळे आणि निखिल मुटक यांच्यासह सोसायटीतील सभासदांनी श्रमदान मोहिमेत सहभाग घेतला.

नियमित श्रमदानाच्या माध्यमातून सोसायटीचा परिसर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासोबतच रहिवाशांमध्ये एकजूट व सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भविष्यातही हा उपक्रम सातत्याने राबवून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी सोसायटी घडविण्याचा निर्धार रहिवाशांनी केला आहे.

‘दोन तास श्रमदानाचे,आपल्या सोसायटीच्या सुंदर भविष्यासाठी !’ या संदेशातून स्वच्छतेचा आणि सामाजिक सहभागाचा नवा आदर्श स्वदेशा हौसिंग सोसायटीने निर्माण केला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“स्वच्छता ही केवळ स्वच्छता कर्मचाऱ्यांची जबाबदारी नसून, आपल्या प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. आपली सोसायटी स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येक रहिवाशाने स्वतः पुढाकार घेणे आवश्यक आहे. त्यामुळे ‘आपली सोसायटी, आपली स्वच्छता’ या संकल्पनेतून महिन्यातील दोन रविवार प्रत्येकी दोन तास श्रमदान करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाला सभासदांचा मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद निश्चितच प्रेरणादायी आहे. श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छतेसोबतच नागरिकांमध्ये सामाजिक बांधिलकी, एकोपा आणि पर्यावरण संवर्धनाची भावना वाढीस लागावी, हा आमचा प्रयत्न आहे. भविष्यातही हा उपक्रम सातत्याने राबवून स्वदेशा हाऊसिंग सोसायटीचा परिसर स्वच्छ, सुंदर आणि आदर्श बनविण्याचा आमचा निर्धार आहे.”

– निलेश खांडगे पाटील, उपाध्यक्ष, सोसायटी फेडरेशन तथा चेअरमन, स्वदेशा हाऊसिंग सोसायटी

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button