Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मिहान इंडियाचा सामाजिक बांधिलकीचा पुढाकार; १ कोटी ३५ लाखांचा CSR निधी वितरित

आरोग्य, महिला सक्षमीकरण, पर्यावरण, शिक्षण आणि नागरी सुविधांसाठी विविध संस्थांना व नागपूर महापालिकेला निधी

नागपूर : मिहान इंडिया लिमिटेडने सामाजिक बांधिलकी जपत विविध लोकहिताच्या उपक्रमांसाठी १ कोटी ३५ लाख रुपयांचा सीएसआर निधी वितरित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रामगिरी या मुख्यमंत्री निवासस्थानी विविध संस्था आणि नागपूर महानगरपालिकेला या निधीचे धनादेश प्रदान करण्यात आले.

यामध्ये जीविका फाऊंडेशनला सर्व्हायकल कॅन्सर लसीकरण अभियानासाठी २५ लाख रुपये देण्यात आले. नागपूर महानगरपालिकेला सांडपाणी व्यवस्थापनासाठी ३५ लाख रुपये, तर महिला सक्षमीकरण प्रकल्पासाठी ३५ लाख रुपयांचा निधी देण्यात आला.

शहरातील हरित क्षेत्र वाढविण्याच्या उद्देशाने वृक्षारोपणासाठी नागपूर महापालिकेला आणखी १० लाख रुपये देण्यात आले. या निधीतून शहरातील पर्यावरण संवर्धनाला चालना मिळणार आहे.

हेही वाचा –  सटाणा–मंगरूळ रस्त्याच्या कामांना गती द्या; दादा भुसे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

वूमन्स एज्युकेशन सोसायटी, नागपूर येथील महाविद्यालयीन इमारत आणि सभागृहाच्या नूतनीकरणासाठी ३० लाख रुपयांचा सीएसआर निधी देण्यात आला. त्यामुळे शैक्षणिक पायाभूत सुविधांच्या विकासाला मदत होणार आहे.

मिहान इंडिया लिमिटेडच्या या सामाजिक उपक्रमातून आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि नागरी सुविधांच्या विकासाला हातभार लागणार आहे.

यावेळी नागपूरच्या महापौर नीता ठाकरे, स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी-वखरे, गटनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर यांच्यासह मिहान इंडिया लिमिटेडचे अधिकारी उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button