मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील ‘‘मिसिंग लिंक’’ मध्ये भीषण अपघात; राष्ट्रवादीचे युवा नेते तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू
फॉर्च्युनरमधील सर्व पाचही जण पिंपरी-चिंचवडमधील वाकड येथील भूमकर चौक परिसरातील रहिवासी

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील (Mumbai Pune Expressway) मिसिंग लिंकवरील (Missing Link Accident) बोगद्यात झालेल्या भीषण अपघातानं (Accident Update) खळबळ उडाली आहे. पुण्याहून (Pune News) मुंबईकडे (Mumbai News) जाणाऱ्या भरधाव फॉर्च्युनरनं मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या एका मालवाहू टेम्पोला जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी आहे. तर, अन्य तिघे सुखरुप बचावले आहेत.
पुण्याहुन मुंबईकडे जाताना मिसिंग लिंकच्या टनलमध्येच अपघात झाला. अपघातानंतर दोन तास मुंबईकडे जाणारी वाहतूक मिसिंग लिंकमधून बंद जुन्या मार्गानं वळवण्यात आली होती. अपघातग्रस्त वाहानं महामार्गावरून हटवल्यानंतर मुंबईकडील लेन पूर्ववत करण्यात आली.
अपघात नेमका झाला कसा? (Mumbai Pune Expressway Missing Link Accident)
मुंबई–पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंकवरील बोगद्यात रात्री दीड वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही गाड्यांचा पुरता चक्काचूर झाल्याचं पाहायला मिळालं. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव फॉर्च्युनरनं मुंबईच्या दिशेनं भाजीपाला वाहतूक करणाऱ्या एका मालवाहू टेम्पोला जोरदार धडक दिली आहे. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आलीय.,या अपघातात अन्य तिघेजण सुखरूप बचावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, फॉर्च्युनरमधील सर्व पाचही जण पिंपरी-चिंचवडमधील वाकड येथील भूमकर चौक परिसरातील रहिवासी आहेत. त्यांच्यापैकी तुषार भूमकर या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.
अपघातानंतर पर्यायी मार्गानं वळवण्यात आलेली वाहतूक पूर्ववत
अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक सुमारे दोन तास बंद ठेवत सर्व वाहनं जुन्या मार्गानं मुंबईकडे वळविण्यात आली होती. महामार्ग पोलीस, आयआरबी पथक देवदूत आणि मदत यंत्रणांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत जखमींना अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. दोन्ही अपघातग्रस्त वाहनं महामार्गावरून हटवल्यानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्ववत करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास महामार्ग पोलीस करत आहेत.





