ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बँकेच्या ताब्यातील ५६ लाखांची फॉर्च्युनर लंपास; निगडी पोलिसांत फसवणूक व चोरीचा गुन्हा

चिंचवड | थरमॅक्स चौक, संभाजीनगर (चिंचवड) येथील श्री गजानन लोकसेवा सहकारी बँक लिमिटेडच्या ताब्यात असलेली सुमारे ₹56 लाख किमतीची टोयोटा फॉर्च्युनर कार परवानगीशिवाय घेऊन गेल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी एका व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी संजय वासुदेव जोशी (वय 67, वारजे, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून हसमुख राजाराम भाटी (वय 35, माणिकबाग, पुणे) यांच्याविरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 520/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 303(2), 316, 317(2) आणि 318(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची पत्नी पिंकी हसमुख भाटी यांनी टोयोटा फॉर्च्युनर कार खरेदीसाठी श्री गजानन लोकसेवा सहकारी बँकेकडून ₹42 लाखांचे वाहन कर्ज घेतले होते. मात्र, कर्जासाठी सादर करण्यात आलेली निवासी व व्यावसायिक मालमत्ता त्यांच्या नावावर नसल्याचे बँकेच्या निदर्शनास आले. त्यानंतर संबंधित फॉर्च्युनर वाहन सिंहगड पोलिसांच्या माध्यमातून बँकेच्या ताब्यात देण्यात आले होते.

हेही वाचा

छत्रपती संभाजीनगरात २१ ते २३ ऑगस्टदरम्यान ‘जिगीषा नाट्यसहवास’; रत्ना पाठक शाह यांच्या हस्ते उद्घाटन

दरम्यान, 26 जून 2025 रोजी दुपारी सुमारे 1.30 वाजता बँकेच्या ताब्यात असलेली एमएच-12-XX-5929 क्रमांकाची फॉर्च्युनर कार आरोपीने बँकेची परवानगी न घेता, दिशाभूल करून व कथित लबाडीच्या हेतूने बँकेसमोरील रस्त्यावरून घेऊन गेल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या घटनेनंतर निगडी पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. आरोपीने वाहन कशा प्रकारे ताब्यात घेतले, तसेच वाहनाचा सध्याचा ठावठिकाणा काय आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button