Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून आढावा

मुंबई : कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचा आढावा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत घेतला. या बैठकीस आमदार आशुतोष काळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव रंगा नायक, जल जीवन मिशनच्या सह अभियान संचालक दिपाली देशपांडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री पाटील म्हणाले, पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित कामे मार्गी लावून नागरिकांना शाश्वत व दर्जेदार पिण्याच्या पाण्याचा लाभ मिळावा. ज्या योजनांची कामे पूर्ण झाली आहेत त्याचा आढावा अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधितांकडून घ्यावा. ज्या योजनांचे सुधारित प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव असतील ते प्राधान्याने पाठवावेत. ज्या योजनांचे काम मूळ अंदाजपत्रकानुसार पूर्ण झाले मात्र अतिरिक्त छोट्या रकमेची गरज आहे अशा पाणी पुरवठा योजनांच्या कामासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्धतेबाबत प्रयत्न व्हावेत.

हेही वाचा –  परिसीमन आणि महिला आरक्षणासाठी सरकारची मोठी खेळी; 17 ऑगस्टपासून विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता

बैठकीत कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी, कुंभारी, मायगाव देवी, सुरेगाव, मळेगाव थडी, धारणगाव, रवंदे, रांजणगाव देशमुख, शिंगणापूर व वारी कान्हेगाव तसेच राहाता तालुक्यातील रुई-शिंगवे, पुणतांबा व नपावाडी येथील जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या कामास सुधारित प्रशासकीय मान्यता देणे, कोकमठाण ता. कोपरगाव येथील पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी आवश्यक जागा संपादनासह मंजुरी देणे आणि माहेगाव देशमुख ता. कोपरगाव येथील जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या वाढीव प्रस्तावास मंजुरी देणे या विषयावर चर्चा करण्यात आली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button