‘मिर्झापूर: द मूव्ही’मधील ‘दो नंबरी’ गाणे प्रदर्शित; हरियाणवी गायक ढांडा न्योलीवालाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Mirzapur the movie : यंदाच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या ‘मिर्झापूर: द मूव्ही’च्या प्रदर्शनापूर्वी चित्रपटातील पहिले गाणे ‘दो नंबरी’ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हे गाणे गायक आणि रॅपर ढांडा न्योलीवाला यांनी लिहिले आहे. तसेच संगीतबद्धही केले आहेत. हरियाणाच्या या गायकाने आपला आवाज देखील केले आहे. विशेष म्हणजे, या गाण्याच्या माध्यमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
सुमारे दोन मिनिटांच्या या गाण्यात ढांडा न्योलीवाला यांचा स्टायलिश आणि दमदार अंदाज पाहायला मिळतो. गाण्यात आलिशान गाड्या, बंदुका आणि खासगी विमानांची झलक दाखवण्यात आली आहे. काही दृश्यांमध्ये ते परदेशी लोकेशनवर दिसतात, तर काही ठिकाणी त्यांचा देसी स्वॅगही दिसतो.
‘मिर्झापूर: द मूव्ही’मधून प्रेक्षकांना पुन्हा एकदा पहिल्या सीझनच्या विश्वात नेण्यात येणार आहे. मोठ्या पडद्यावर प्रथमच गुड्डू पंडित (अली फजल), मुन्ना भैया (दिव्येंदू शर्मा) आणि कालीन भैया (पंकज त्रिपाठी) ही लोकप्रिय पात्रे एकत्र दिसणार आहेत.
हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६’ माहिती पुस्तिकेचे प्रकाशन
दमदार स्टारकास्ट
सुमारे दोन मिनिटांच्या या गाण्यात ढांडा न्योलीवाला यांचा स्टायलिश आणि दमदार अंदाज पाहायला मिळतो. गाण्यात आलिशान गाड्या, बंदुका आणि खासगी विमानांची झलक दाखवण्यात आली आहे. काही दृश्यांमध्ये ते परदेशी लोकेशनवर दिसतात, तर काही ठिकाणी त्यांचा देसी स्वॅगही दिसतो.
पुन्हा भेटणार ‘मिर्झापूर’चे हे दिग्गज