Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

अभिनेत्री त्रिशाबाबत वादग्रस्त विधान भोवले; तमिळनाडूचे विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन पोलिसांच्या ताब्यात

Udhayanidhi Stalin | तमिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री त्रिशाबद्दल जाहीर सभेत वादग्रस्त आणि अश्लील टिप्पणी केल्याप्रकरणी तमिळनाडू पोलिसांनी मंगळवारी उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना चेन्नई येथील निवास्थानावरून ताब्यात घेण्यात आले असून चौकशीसाठी तंजावर येथे नेले जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, संभाव्य अटक टाळण्यासाठी स्टॅलिन यांनी अंतरिम जामिनासाठी मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यावर दुपारी सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा

१५० कोटींच्या सायबर घोटाळ्याचा पर्दाफाश; मोशीतील तरुण अटकेत

तंजावर येथे कावेरी पाणी वाटपाच्या मुद्द्यावरून द्रमुकतर्फे (DMK) आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात उपस्थितांना संबोधित करताना उदयनिधी स्टॅलिन यांनी राज्याचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्यावर जोरदार टीका केली. तमिळनाडूच्या वाट्याचे कावेरीतील पाणी मिळवून देण्यात मुख्यमंत्री अपयशी ठरल्याचा आरोप ते करत होते.

त्यांचे भाषण सुरू असतानाच उपस्थितांमधून काही लोकांनी ‘त्रिशा, त्रिशा’ असा घोषणाबाजी केली. त्यावर उदयनिधी यांनी भाषण थांबवून एक द्वयर्थी (Double Meaning) व वादग्रस्त वक्तव्य केले. हे विधान अत्यंत अश्लील आणि महिलांचा अवमान करणारे असल्याचा आरोप होत असून यावरून तमिळनाडूच्या राजकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button