Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

१५० कोटींच्या सायबर घोटाळ्याचा पर्दाफाश; मोशीतील तरुण अटकेत

आळंदी | देशातील विविध राज्यांतील ६५ नागरिकांना इन्व्हेस्टमेंट फ्रॉडसह विविध प्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीत अडकवून तब्बल १५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील टोळीशी संबंधित असल्याच्या आरोपावरून सचिन संजय काळे (वय २५, रा. गोडाऊन चौकाजवळ, मोशी, ता. हवेली, जि. पुणे) याला आळंदी पोलिसांनी अटक केली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत आळंदी पोलीस ठाण्यात स्थापन करण्यात आलेल्या सायबर सेलमार्फत ‘म्युल अकाउंट’ संदर्भात तपास सुरू होता. या तपासादरम्यान सचिन काळे याचे कॉसमॉस बँक, आळंदी येथील बचत खाते ऑनलाइन फसवणुकीतून मिळालेली रक्कम स्वीकारण्यासाठी वापरले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २७४/२०२६ आणि २८३/२०२६ अन्वये बीएनएसच्या विविध कलमांखाली दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांच्या तपासानुसार, आरोपीने स्वतःच्या नावावर विविध बँकांमध्ये एकूण ९ बँक खाती उघडली होती. सायबर फसवणुकीतून आलेली रक्कम या खात्यांवर स्वीकारून ती एटीएम तसेच चेकच्या माध्यमातून काढण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

हेही वाचा

अपयशाची भीती बाळगू नका, सकारात्मक विचार करा, नक्कीच यश मिळेल; सिध्दार्थ जाधव

विशेष म्हणजे, NCRP पोर्टलवरील उपलब्ध माहितीनुसार देशातील विविध राज्यांतील एकूण ६५ नागरिकांची सुमारे १५० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यापैकी सचिन काळे याच्या विविध तीन बँक खात्यांमध्ये सुमारे १ कोटी १५ लाख रुपये जमा झाल्याचे तपासात आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी काळे याला अटक केली असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध आणि पुढील आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशीकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आव्हाड, अपर पोलीस आयुक्त प्रादेशिक विभाग बसवराज तेली, पोलीस उपायुक्त मारुती जगताप आणि सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश रांजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. एस. नरके, उपनिरीक्षक तुकाराम खडके, महिला पोलीस हवालदार आरती निकम, पोलीस शिपाई सोळंके आणि जगताप यांच्या पथकाने केली.

पोलिसांचे नागरिकांना आवाहन

आपल्या नावावरील बँक खाते किंवा सिमकार्ड कोणत्याही अनोळखी व्यक्तीला वापरण्यास देऊ नये. तसेच अनोळखी व्यक्तीकडून ऑनलाइन पैसे स्वीकारून ते एटीएम किंवा चेकद्वारे रोख स्वरूपात काढून देऊ नयेत. अशी रक्कम ऑनलाइन फसवणुकीतून आलेली असण्याची शक्यता असून संबंधित बँक खाते ‘म्युल अकाउंट’ म्हणून वापरले जाऊ शकते, असा इशारा पोलिसांनी दिल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button