प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे गुरुपौर्णिमा भक्तिभावाने साजरी

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
ज्ञान, संस्कार आणि मूल्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्याच्या उद्देशाने प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे गुरुपौर्णिमा उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व गुरुंच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी गुरुंच्या महत्त्वावर आधारित मनोगते, कविता, भक्तिगीते तसेच सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व, शिस्त, ज्ञान आणि चारित्र्य यांचे मूल्य समजावून सांगितले.
हेही वाचा – मोदींची CCS बैठक सुरू ; अजित डोवाल उपस्थित, राष्ट्रीय सुरक्षेबाबत घेणार मोठा निर्णय?
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये गुरुजनांविषयी आदर, कृतज्ञता आणि संस्कारांची जाणीव अधिक दृढ झाली. संपूर्ण शाळा परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. शाळेच्या व्यवस्थापनाने व प्राचार्यांनी विद्यार्थी व शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, असे मत व्यक्त केले.





