Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

प्रसिद्ध अभिनेत्री सायबर क्राइमची शिकार, काही मिनिटांत अकाउंटमधून लाखो लंपास

Bollywood Actress Victim To Cyber Fraud : मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्रीची सायबर फसवणूक झाली आहे. वर्सोवा येथे राहणारी चित्रपट अभिनेत्री आणि निर्माती कीर्ति कुल्हारी हिची सायबर फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात सायबर गुन्हेगारांनी तिच्या मोबाईल फोन आणि क्रेडिट कार्डची अनधिकृत माहिती मिळवून अवघ्या काही मिनिटांत 2 लाख 43 हजार 852 रुपये काढून घेतले. या प्रकरणी कीर्ति कुल्हारीने पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.

कीर्ति कुल्हारीने दिलेल्या तक्रारीवरून अंबोली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कीर्ति कुल्हारी या वर्सोवा येथील यारी रोडवरील संगीता अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहतात. 24 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 9.31 वाजता त्या अंधेरी पश्चिम येथील फन रिपब्लिक मॉलजवळील सिनेपोलिस थिएटरमध्ये चित्रपट पाहत होत्या. त्याचवेळी त्यांच्या मोबाईलवर क्रेडिट कार्डवरून एअरोमेक्सिको एअरलाईन्ससाठी 2,525 अमेरिकन डॉलर्स खर्च झाल्याचा अलर्ट संदेश आला.

हेही वाचा –  ‘मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा’; मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

कीर्ति कुल्हारीला परदेशातील संशयास्पद व्यवहाराचा मेसेज मिळताच त्यांनी तातडीने बँकेच्या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधला. बँकेच्या अधिकाऱ्यांनी तपास केल्यानंतर त्यांच्या क्रेडिट कार्डवरून परवानगीशिवाय चार वेगवेगळे मोठे व्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित क्रेडिट कार्ड तात्काळ ब्लॉक करण्यात आले.या प्रकरणी अंबोली पोलिसांनी अज्ञात सायबर गुन्हेगाराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button