कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला अखेर यश; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

नवी दिल्ली | गेल्या एका महिन्यापासून नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी पेटलेल्या तीव्र आंदोलनानंतर केंद्र सरकारला मोठा धक्का बसला आहे. आंदोलकांच्या वाढत्या दबावासमोर झुकत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आज, २५ जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली चाललेल्या या आंदोलनाचे हे मोठे यश मानले जात आहे.
नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावरून दिल्लीत गेल्या महिन्याभरापासून कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने जोरदार निदर्शने सुरू होती. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर कॉक्रोच जनता पार्टी आणि देशभरातील विद्यार्थी ठाम होते. या आंदोलनाला पाठिंबा देत प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक हेदेखील बेमुदत उपोषणाला बसले होते. २३ जुलै रोजी त्यांनी उपोषण मागे घेतले असले, तरी कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके यांनी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली होती. या आंदोलनाला केवळ विद्यार्थ्यांकडूनच नव्हे, तर देशभरातून आणि विरोधी पक्षांकडूनही मोठा पाठिंबा मिळाला होता. विरोधकांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका करत प्रशासनाला धारेवर धरले होते.
हेही वाचा
मोशी कचरा डेपोवरील ताण कमी करण्यासाठी पर्यायी जागांचा शोध!
Union Education Minister Dharmendra Pradhan posts a letter, says he has sent his resignation to PM Modi. pic.twitter.com/cRLml7WAl7
— Press Trust of India (@PTI_News) July 25, 2026
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची बातमी समोर येताच आंदोलक विद्यार्थी आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. हा देशातील हजारो विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा आणि सत्याचा विजय असल्याचे सांगत शिक्षणव्यवस्थेतील पारदर्शकता टिकवण्यासाठी हे पाऊल अत्यंत आवश्यक होते, अशी प्रतिक्रिया कॉक्रोच जनता पार्टीकडून देण्यात आली आहे. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आता नीट परीक्षा गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.





