Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

टीईटी पेपरफुटीचा ‘मास्टरमाइंड’ जेरबंद! बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक

TET Paper Leak 2026 | महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदमार्फत २८ जून रोजी राज्यभरात आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा २०२६ (टीईटी) चा पेपर फुटल्याच्या धक्कादायक प्रकरणात ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. गेल्या महिन्याभरापासून पोलिसांना गुंगारा देणारा या प्रकरणातील मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ता याला अखेर बिहारमधून अटक करण्यात आली आहे.

परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त डॉ. पवन बनसोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बिजेंद्र गुप्ता याला बिहारहून पुणे विमानतळावर आणण्यात आले असून पुढील तपासासाठी आणि न्यायालयात हजर करण्यासाठी त्याला ठाण्यात आणले जात आहे.

तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आग्रा येथील ‘माहीम पत्रान प्रायव्हेट लिमिटेड’ या छापखान्यात छापण्यात आल्या होत्या. मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ता याने या कारखान्यातील दोन विद्यमान कर्मचारी आणि एका माजी कर्मचाऱ्याला केवळ ८,००० रुपये देऊन प्रश्नपत्रिका फोडण्यासाठी तयार केले होते. या कर्मचाऱ्यांनी अत्यंत शातिरपणे आपल्या बुटांच्या तळव्यात लपवून गोपनीय प्रश्नपत्रिकेच्या प्रती बाहेर काढल्या होत्या.

हेही वाचा

चिखली येथील गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ‘शैक्षणिक वारी’ उत्साहात संपन्न

दीड कोटींचा काळोख अन् पत्नीचीही साथ!

भिवंडीचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी स्पष्ट केले की, ही प्रश्नपत्रिका उमेदवारांना तब्बल दीड कोटी रुपयांना विकली जाणार होती. याप्रकरणी यापूर्वीच भिवंडीतील कोनगाव परिसरातून राजीव कुमार, आकाश कुमार (दोघे रा. बिहार) आणि धीरज सिंह (रा. हरियाणा) या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

तसेच, या आंतरराज्यीय पेपरफुटीच्या जाळ्यात बिजेंद्र गुप्ताची पत्नी सुमन गुप्ता हिचाही सक्रिय सहभाग असल्याचे समोर आले असून तिलाही अटक करण्यात आली आहे. पेपरफुटीची साखळी सुरळीत चालवण्यासाठी ती मुख्य भूमिका बजावत होती, असा पोलिसांना संशय आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button