Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

लखनौ सुपर जायंट्सने ऋषभ पंतला सोडलं, आता या खेळाडूवर नजर! सीएसकेला दिली ऑफर

IPL : आयपीएल 2027 स्पर्धेच्या मिनी लिलावापूर्वी ट्रेड विंडोच्या माध्यमातून खेळाडू अदलाबदली करण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. असं असताना लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल 2026 संपल्यानंतरच या कामाला सुरूवात केली आहे. लखनौने कर्णधार ऋषभ पंतला रिलीज करत दिल्लीकडे सुपूर्द केलं. तर कुलदीप यादवला त्या बदल्यात आपल्या संघात घेतलं आहे. आता लखनौ सुपर जायंट्सने आणखी एक डाव टाकण्याचा निर्णय घेतला आहे. लखनौ सुपर जायंट्सने थेट चेन्नई सुपर किंग्सशी संपर्क साधल्याचं बोललं जात आहे. रिपोर्टनुसार, लखनौ सुपर जायंट्सने युवा आक्रमक फलंदाज उर्विल पटेलच्या बदल्यात भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला ट्रेड करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. लखनौ सुपर जायंट्स आपल्या संघातील फलंदाजांची फळी मजबूत करण्यासाठी उर्विल पटेलला आपल्या संघात घेऊ इच्छिते.

उर्विल पटेलला चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2025 लिलावात फक्त 30 लाखात विकत घेतलं होतं. त्यानंतर त्याला 2025 आयपीएल पर्वात तीन डावात फलंदाजीची संधी मिळाली. त्यात त्याने 68 धावा केल्या. आयपीएल 2026 स्पर्धेत युवा फलंदाज आयुष म्हात्रे दुखापतग्रस्त झाला आणि उर्विल पटेलला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली. त्याने या संधीचं सोनं केलं आणि 201.5 च्या स्ट्राईक रेटने 129 धावा केल्या. पण पुढच्या पर्वात आयुष म्हात्रे एन्ट्री झाल्यानंतर उर्विल पटेलला प्लेइंग 11 मध्ये जागा मिळणं कठीण होऊ शकतं. ही शक्यता पाहता लखनौ सुपर जायंट्सने हा डाव टाकला आहे. यासाठी लखनौने स्टार गोलंदाज मोहम्मद शमीला देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

हेही वाचा –  शरीरात या ४ जीवनसत्त्वांची कमतरता असल्यास वाढतो स्मृतिभ्रंशाचा धोका

चेन्नईला पावरप्ले आणि डेथ ओव्हरमध्ये षटकं टाकण्यासाठी एका अनुभवी गोलंदाजाची गरज आहे. खलील अहमदला साथ देईल असा गोलंदाजाच्या शोधात चेन्नई सुपर किंग्स आहे. अशा स्थितीत मोहम्मद शमीच्या ट्रेडमुळे लाभ मिळू शकतो. स्पेंसर जॉन्सन आणि मॅट हेनरीसोबत शमी संघात आल्याने गोलंदाजीला आणखी धार चढेल. मागच्या पर्वातही मोहम्मद शमीला सनरायझर्स हैदराबादकडून लखनौने ट्रेड केलं होतं. त्याने आयपीएल 2026 च्या 13 सामन्यात 9 च्या इकोनॉमी रेटने 12 विकेट घेतल्या. पण आता टॉप ऑर्डर आक्रमक करण्यासाठी लखनौ शमीला सोडण्याची तयारी करत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button