ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

संत साई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी

आषाढी एकादशी उत्सव अहवाल २०२६–२७

पिंपरी | संत साई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दि. २४ जुलै २०२६ (शुक्रवार) रोजी सकाळी ८.३० वाजता आषाढी एकादशी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. “भक्ती, शिस्त आणि संस्कार – आषाढी एकादशीचा उत्सव” या विषयावर आधारित हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

कार्यक्रमाची सुरुवात माननीय प्राचार्य श्री. शिवलिंग ढवळेश्वर सर , प्रमुख पाहुणे श्री सुभाषजी घेटे महाराज यांचे स्वागत करून झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले तसेच भगवान विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांचे पूजन करून कार्यक्रमाला भक्तिमय वातावरण लाभले.

हेही वाचा

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या भक्तिनिवासाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

यानंतर पारंपरिक पद्धतीने पालखी पूजन व पालखी सोहळा संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अभंग गायनाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. पूर्वी जावळगी (इ. ५ वी अ), यश वानखेडे (इ. ५ वी ब), अवनी हांडे (इ. ९ वी क), ईशान राऊत (इ. ६ वी ब) आणि विभावरी सुतार (इ. ९ वी क) यांनी सुंदर अभंग सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

यानंतर विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच श्रीमती मीरा कटमोरे मॅडम व त्यांच्या समूहाने सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उत्सवाची शोभा अधिक वाढवली.

कार्यक्रमाचा समारोप ‘पसायदान’ सादर करून करण्यात आला. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना भक्ती, शिस्त, नैतिक मूल्ये आणि महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे महत्त्व समजले. हा संपूर्ण कार्यक्रम अत्यंत यशस्वी, प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button